देवडी शिवारातुन पावणे दॊन लाखांच्या जर्सी गायींची चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jersey cow

गोठ्यात बांधलेल्या पावणेदोन लाख रुपयांच्या तीन जर्सी गायींची चोरी झाल्याची घटना शुक्रवार ता 24 रोजी च्या मध्यरात्री देवडी शिवारात घडली.

Cow Theft : देवडी शिवारातुन पावणे दॊन लाखांच्या जर्सी गायींची चोरी

मोहोळ - गोठ्यात बांधलेल्या पावणेदोन लाख रुपयांच्या तीन जर्सी गायींची चोरी झाल्याची घटना शुक्रवार ता 24 रोजी च्या मध्यरात्री देवडी शिवारात घडली. याबाबत आज्ञात चोरट्या विरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, देवडी येथील आकाश भारत थोरात हे देवडी शिवारातील त्यांच्या शेतात राहतात. त्यांचा दुग्ध व्यवसाय आहे. गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता नेहमीप्रमाणे जेवण खान करून थोरात हे गायींना चारा टाकून झोपले. रात्री दोन वाजता त्यांना जाग आली असता त्यांनी गायींच्या गोठ्याकडे जाऊन पाहिले.त्यांना सात गायी पैकी दोन गायी बांधलेल्या ठिकाणी आढळून आल्या नाहीत. त्यामुळे थोरात यांनी गोठ्याच्या आजूबाजूच्या परिसरात गायींचा शोध घेतला, परंतु गायी दिसून आल्या नाहीत. त्यानंतर आकाश याने वडील भारत यांना उठविले व झाला प्रकार सांगितला.

त्यानंतर आकाशचा चुलत भाऊ रोहित अशोक थोरात हा त्यांच्या शेजारीच राहतो. त्याला उठवून आमच्या दोन गाई बांधलेल्या ठिकाणी नसल्याचे आकाश याने सांगीतले. रोहितला शंका आल्याने त्यानेही त्याच्या गोठ्यात जाऊन पाहिले असता सहापैकी त्याचीही एक गाय बांधलेल्या ठिकाणी आढळून आली नाही. दोघांनी मिळून पुन्हा परिसरात गायींचा शोध घेतला परंतु, गाई कुठेच दिसून आल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या एक लाख 70 हजाराच्या तीन गायींची चोरी झाल्याची खात्री झाली. याबाबत आकाश भारत थोरात यांनी मोहोळ पोलिसात फिर्याद दिली असून अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल चव्हाण करीत आहेत.

टॅग्स :crimemoholCowthief