जनावराच्या गोठ्याला आग लागून तीन जनावरांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fire

जनावराच्या गोठ्याशेजारी असलेला गवताचा बांध पेटवल्याने गोठ्याला आग लागून 90 हजाराची तीन जनावरे जळून मृत्युमुखी पडल्याची घटना देगाव, ता. मोहोळ येथे घडली.

Mohol Fire : जनावराच्या गोठ्याला आग लागून तीन जनावरांचा मृत्यू

मोहोळ - जनावराच्या गोठ्याशेजारी असलेला गवताचा बांध पेटवल्याने गोठ्याला आग लागून 90 हजाराची तीन जनावरे जळून मृत्युमुखी पडल्याची घटना देगाव, ता. मोहोळ येथे 27 मार्च रोजी दुपारी चार वाजता घडली. या प्रकरणी पती-पत्नीवर गुन्हा दाखल झाला आहे. मेघराज मधुकर दगडे व सोनाली मेघराज दगडे दोघेही रा देगाव अशी गुन्हा दाखल झालेल्यां नावे आहेत.

मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, नागनाथ शहाजी दगडे (वय-31) रा. देगाव व मेघराज दगडे यांची शेती जवळजवळ आहे. ता. 27 रोजी नागनाथ दगडे हे त्यांच्या शेतात ज्वारीचे पीक काढत होते. त्यावेळी नागनाथ यांना त्यांच्या शेताच्या शेजारी असलेला गवताचा बांध पेटल्याचे दिसले. बांध पेटत जनावरांच्या गोठ्याजवळ आला, व गोठ्याला आग लागली. गोठ्या मध्ये एक गाभण गाय व दोन खोंड अशी तीन जनावरे बांधलेली होती. आगीच्या ज्वाला जस जशा त्यांना लागतील तशी जनावरे मोठ्याने ओरडत होती. आग भडकल्याने नागनाथ दगडे हे जनावरांना वाचवू शकले नाहीत. तिन्ही जनावरे जळून मृत्युमुखी पडली.

दरम्यान सोनाली दगडे ही बांध पेटवून शेजारीच थांबली होती. तुझ्या बांध पेटविण्या मुळेच माझ्या गोठ्याला आग लागली व जनावरे जळून गेली असे नागनाथ दगडे यांनी तिला सांगितले. त्यावेळी मला हा बांध पेटवण्यासाठी माझे पती मेघराज यांनी सांगितल्याचे तिने सांगितले. नागनाथ दगडे यांनी नातेवाईकांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु आग मोठ्या प्रमाणात भडकल्याने ती विझवता आली नाही. या प्रकरणी नागनाथ शहाजी दगडे रा देगाव यांनी मोहोळ पोलिसात फिर्याद दिली असून मोहोळ पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :firedeathmoholanimal