पंतप्रधान मोदींनी केलेली कामे सामान्यांपर्यंत पोचवा : खासदार निंबाळकर

MP Ranjitsingh Naik Nimbalkar as the convener of Mohol Assembly constituency
MP Ranjitsingh Naik Nimbalkar as the convener of Mohol Assembly constituency

मोहोळ (सोलापूर) : मोहोळ विधानसभा मतदारसंघातील अडीअडचणी सोडविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करू, लवकरात लवकर त्या मार्गी लावू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक वर्ष कालावधीत केलेली सर्व विकासकामे सर्वसामान्यांपर्यंत पोचवा. येत्या विधानसभेचा आमदार हा भाजपचा झाला पाहिजे त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केले.
मोहोळ विधानसभा मतदारसंघाच्या संयोजकपदी खासदार निंबाळकर यांची नियुक्ती झाली आहे. मतदारसंघातील अडीअडचणी जाणून घेण्यासाठी ते मोहोळ येथे आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश काळे, पिंटू राऊत, अजय कुर्डे, मदन लाळे, संजय क्षीरसागर, बाळासाहेब पाटील, रमेश माने, लक्ष्मण कृपाळ, तानाजी दळवी, शशी दळवे, महेश चेंडगे, महादेव आवारे, अजय गावडे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोहोळ विधानसभा मतदारसंघातील नागरिक अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. त्यांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी प्रयत्न करू, असे खासदार निंबाळकर यांनी आश्‍वासन दिले.
या वेळी मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयाला रुग्णवाहिका नाही, ती तातडीने उपलब्ध करून द्यावी, आष्टी तलावात कायमस्वरूपी अर्धा टीएमसी पाणी सोडण्याचे नियोजन करावे, पोखरापूर टप्पा क्रमांक दोनचे काम निधीअभावी रखडले आहे त्याला निधी उपलब्ध करून द्यावा, ग्रामीण रुग्णालयात जादा खाटांची सोय नाही ती उपलब्ध करावी आदी मागण्या तालुकाध्यक्ष काळे यांनी केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com