महावितरण कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा! शेतकऱ्याला दिले एक लाख रिटर्न

महावितरण कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा! शेतकऱ्याला दिले एक लाख रिटर्न
महावितरण कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा! शेतकऱ्याला दिले एक लाख रिटर्न
महावितरण कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा! शेतकऱ्याला दिले एक लाख रिटर्नesakal
Summary

जगात प्रामाणिकपणा लोप पावत चालला असल्याची काहीजण ओरड करीत असले, तरी दुसऱ्या बाजूला प्रामाणिक माणसेही आहेत.

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : जगात प्रामाणिकपणा लोप पावत चालला असल्याची काहीजण ओरड करीत असले, तरी दुसऱ्या बाजूला प्रामाणिक माणसेही आहेत. याचाच प्रत्यय माढा (Madha) तालुक्‍यातील उपळाई बुद्रूक येथे महावितरणच्या (MSEDCL) कर्मचाऱ्यांकडून पाहायला मिळाला आहे. चुकून शेतकऱ्याकडून महावितरणच्या कर्मचाऱ्यांना आलेले एक लाख पाच हजार रुपये परत करत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणाचा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे.

महावितरण कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा! शेतकऱ्याला दिले एक लाख रिटर्न
MPSC वयोमर्यादा वाढीला आचारसंहितेची बाधा! अर्जाची वाढेल मुदत

सध्या सर्वत्र महावितरणच्या वतीने शेतीपंपाची वसुली सुरू आहे. त्यानुसार उपळाई बुद्रूक येथे वायरमन विनोद जाधव, संतोष वागज व मीटर रीडर अस्लम आतार हे शेतीपंपाची वसुली करून तातडीने रोहित्र सुरू करून देत आहेत. रविवारी (ता. 28) उपळाई बुद्रूक येथील हेडगिरे डीपीवरील (रोहित्र) शेतकऱ्यांनी थकीत वीजबिले माढा महावितरणचे कर्मचारी विनोद जाधव व संतोष वागज यांच्याकडे जमा केली. या दोघांकडे इतर डीपीवरील शेतकरी ग्राहकांचे पैसे असल्याने, ती रक्कम शेतातील काम आटोपून येईपर्यंत संजय हेडगिरे या शेतकऱ्याच्या दुकानात ठेवली व नंतर शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सुरळीत करून आल्यानंतर, महावितरणच्या या कर्मचाऱ्यांनी हेडगिरे यांच्या दुकानात ठेवलेली पैशांची पिशवी घेऊन निघून गेले. परंतु सोमवारी सकाळी भरणा करण्यासाठी पैशांची जुळवाजुळव करत असताना जवळपास एक लाखहून अधिक रुपये जास्त येत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी गावातील शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे जमा केलेली सर्व थकबाकी वीजबिले तपासली असता, हेडगिरे यांच्याकडून नजरचुकीने दुकानातून जादा रक्कम आली असल्याची त्यांची खात्री पटली.

त्यामुळे महावितरणचे कर्मचारी संतोष वागज व विनोद जाधव यांनी शेतकरी संजय हेडगिरे यांना बोलावून तुमच्याकडून एक लाख रुपये रक्कम नजरचुकीने आमच्याकडे जास्त आली आहे, असे सांगितले. परंतु, संजय हेडगिरे यांना एवढी रक्कम असल्याने, हे कर्मचारी आपली मस्करी करत असल्याचे वाटले. परंतु त्यांनी नंतर शहानिशा केली व नजरचुकीने झाले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे नजरचुकीने आलेले पैसे माघारी दिल्याने, त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

दुकानातील पैसे नजरचुकीने महावितरणच्या कर्मचाऱ्यांना जास्त गेले होते, याची आम्हाला कल्पना देखील नव्हती. परंतु त्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने मला फोन करून ही माहिती देत रक्कम माघारी दिली. त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.

- संजय हेडगिरे, शेतकरी, उपळाई बुद्रूक

महावितरण कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा! शेतकऱ्याला दिले एक लाख रिटर्न
आपल्याच लेकरांनी केलेले घाव सोसणारी 'डीसीसी' ठणठणीत होणार कधी?

दिवसभर अनेक शेतकऱ्यांकडून थकित वीजबिले जमा झाली होती. ती जुळवाजुळव करत असताना अधिक रक्कम येत असल्याने दिवसभरातील सर्व डीपीवरील जमा केलेले पैसै तपासले तरी, एक लाखाहून अधिक रुपये जास्त येत होते. त्यामुळे जास्त आलेले पैसे हे हेडगिरे यांचे आहेत, हे लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने माहिती देऊन ती रक्कम सुपूर्द केली.

- विनोद जाधव व संतोष वागज, महावितरण कर्मचारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com