सोलापूर भारनियमन काळातील चोरीच्या घटनेची जबाबदारी महावितरणची!

भारनियमन काळातील चोरीच्या घटनेची जबाबदारी महावितरणची राहील असा इशारा शहरातील नागरिकांनी महावितरणला दिला
MSEDCL responsible for theft in Solapur till load shedding period
MSEDCL responsible for theft in Solapur till load shedding periodsakal

मंगळवेढा : शहर व तालुक्यातील वीज ग्राहकांना त्रास देण्याचा सपाटा महावितरणने कायम ठेवला असून रात्रीच्या वेळी भारनियमन सुरु केल्यामुळे होणाऱ्या भारनियमन काळातील चोरीच्या घटनेची जबाबदारी महावितरणची राहील असा इशारा शहरातील नागरिकांनी महावितरणला दिला. कोळसा टंचाईचे कारण सांगून महावितरणने शहर व ग्रामीण भागात मनमानी पद्धतीने भारनियमन सुरू केले असतानाच दिवसा बरोबर आता रात्री 12 ते 2.30 दरम्यान भारनियमन सुरू केले आहे.

यामुळे रात्रीच्या वेळी रस्त्यावरील दुकाने बंद असल्यामुळे भारनियमनामुळे अंधारांचे साम्राज्य असते शिवाय गल्लोगल्ली देखील अंधार पडल्यामुळे चोरट्यांना चोरीच्या घटना करणे सहज शक्य होत आहे आणि चोरीनंतर चोरांना पळून जाणे देखील सुलभ होत आहे त्यामुळे या पुढील काळात भारनियमनाच्या वेळी चोरीच्या घटना झाल्यास त्याची जबाबदारी महावितरणची राहील. मध्यरात्री चोरट्यांना चोरीच्या घटना करणे सहज शक्य होईल अशा पद्धतीने भारनियमन सुरू केले या अनपेक्षित भारनियमनामुळे रात्रीच्या वेळी उष्माघातामुळे वयोवृद्ध, लहान मुलांना बरोबर आजारी रुग्णांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

वास्तविक पाहता भारनियमन करावयाचे असेल तर दिवसाच्या वेळा निश्चित करून करण्यास हरकत नाही मात्र रात्रीच्या वेळी चुकीच्या पद्धतीने भरणे बंद करून नागरिकांना त्रास देण्याचा सपाटा लावला आहे त्यामुळे महावितरण च्या अधिकाऱ्यानी मंगळवेढ्यातून कोण विचारणार नाही त्यामुळे आपल्या सोयीने भारनियमन करू अशी परिस्थिती निर्माण करून ठेवली आहे. रात्रीचे भारनियमन रद्द करावे या मागणीवर आज देण्यात आलेल्या निवेदनावर पक्षनेते अजित जगताप,माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, सार्वजनिक शिवजयंती मंडळाचे अध्यक्ष संभाजी घुले,भारत नागणे,राहुल सावंजी,ज्ञानेश्वर भगरे, हर्षद डोरले,मुजम्मिल काझी, प्रशांत यादव, प्रदीप खवतोडे,प्रवीण खवतोडे, सोमनाथ बुरजे,सुभाष भंडारे शरद हेंबाडे,ज्ञानेश्वर कौडूभैरी यांच्या सह्या आहेत. रात्रीचे भारनियमन रद्द करण्याबाबत महावितरणने अंमलबजावणी व्हावी न केल्यास महावितरणच्या कार्यालयासमोर शहरातील नागरीका बरोबर जन आंदोलन उभा करू अजित जगताप पक्षनेते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com