'भाजपला नेहरुंची समाजवादी विचारसरणी बदलायची आहे'

Nagnath Kotapalles big statement about BJP
Nagnath Kotapalles big statement about BJP

बार्शी (सोलापूर) : नेहरुंची समाजवादी विचारसणीची दिशा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजप सरकारला बदलायची आहे. बहुसंख्याच्या जोरावर हवे तसे कायदे निर्माण केले जात आहेत. भारतीय संविधानापूढे गोळवलकरी विचारधारेचे सर्वात मोठे आव्हान उभे राहिले आहे, असे प्रतिपादन माजी कुलगुरू नागनाथ कोत्तापल्ले यांनी केले. 
कॉ. गोविंद पानसरे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्ताने आयटक कामगार केंद्र व प्रगतिशील लेखक संघ यांच्या वतीने यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या व्याख्यानात कोत्तापल्ले बोलत होते. मंचावर प्राचार्य डॉ. महेंद्र कदम, कॉ. प्रा. तानाजी ठोंबरे उपस्थित होते. 
कोत्तापल्ले म्हणाले, संविधान सभेतल्या शेवटच्या सभेतील डॉ. बाबासाहेबांनी भाषणात सांगितलेले धोके आज आपल्यापूढे उभे आहेत. घातपाताच्या मार्गाचा अवलंब करत सांस्कृतिक राजकारणाचे पूरस्कर्ते संविधानाचा ढाचा तसाच ठेवून बहूसंख्याच्या जोरावर गोळवळकरी विचारधारेस हवे असणारे कायदे निर्माण करीत आहेत. संविधानाच्या उद्देशीकेला हरताळ फासत सामाजिक, राजनैतिक, आर्थिक न्यायापासून जनतेला वंचित करत देशात असमानतेची दरी हेतूपूरस्परपणे निर्माण करीत आहे. रास्वसंघ जातवादाच्या संवेदना वाढवत आहे. नागरिक विभागले जावून शोषण करणे शक्‍य होत आहे. जनमानसाच्या मेंदुवर चढलेला भ्रमाचा लेप काढून सामाजिक आर्थीक असमता नकारून समतेचा आग्रह धरावयास लावून जनतेस संघर्षास उतरावयास लावणे हेच आव्हान आपल्यासमोर आहे, असे झाले तरच संविधानाची परिपूर्ती होईल, असे कोतापल्ले यांनी स्पष्ट केले. 
कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉ. ठोंबरे म्हणाले, सध्या देशात सर्वात मोठे संकट उभा आहे. आपण पुरोगाम्यांनी आपल्यातील फुटी बाजूला सारून एकत्र येवून संघर्ष करण्याची वेळ आहे. देशात विद्यार्थी तरूण संघर्शाला उतरले आहेत. संविधाला सोबत घेत सर्वांसोबत कष्टकरी जनता संघर्षाच्या मार्गाने पूढे जाईल व धर्मांध शक्तींचे संकट पेलेल असा विश्‍वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. सूत्रसंचलन प्रा. डॉ. रविकांत शिंदे, स्वागत प्रा. डॉ. भारती रेवडकर पाहूण्यांची ओळख प्रा. डॉ. दत्तात्रय घोलप यांनी केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासठी कॉ. ए. बी. कुलकर्णी, प्रा. डॉ. ए. बी. कदम, प्रा. डॉ. बिरा पारसे, कॉ. प्रविण मस्तुद, कॉ. शौकत शेख, आयूब शेख, दलित संघटनांचे प्रतिनीधी उपस्थित होते. बार्शी नगरपालिका कर्मचारी, घरेलू कामगार संघटना, डॉ. जगदाळे मामा हॉस्पीटल येथील बहूसंख्य महिला, कॉ. लहू आगलावे, कॉ. भारत भोसले, भारती मस्तुद, किसन मूळे, अनिरूध्द नकाते, संतोष मोहिते, पवन आहिरे, भारत पवार, आयाज शेख, शुभम शिंदे यांनी परिश्रम घेतले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com