Solapur : पवारांच्या समर्थनार्थ डोके आपटणारे काही दिवसापूर्वी बीजेपीच्या दरात प्रवेशासाठी उभे होते - नारायण राणे

बारसू प्रकल्प झाला पाहिजे जर उद्धव ठाकरे जाणार असेल तर मीही बारसूला जाणार
Narayan Rane criticize supporters of sharad Pawar likely to join BJP politics
Narayan Rane criticize supporters of sharad Pawar likely to join BJP politicssakal

मंगळवेढा : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ डोके आपटणारे काही दिवसापूर्वी बीजेपीच्या दरात प्रवेशासाठी उभे होते मी त्याला ढोंग मारणार नाही अशी असा खोचक टोला सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मंगळवेढा येथे पत्रकारांशी बोलताना लागावत पक्षीय राजकारणातून विश्रांती घेण्याचा निर्णय वैयक्तिक असल्याचे ते म्हणाले.

शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कृषी उद्योग मेळाव्याच्या समारोपानंतर ते पत्रकारांशी बोलत होते ते म्हणाले की, बारसू प्रकल्प झाला पाहिजे जर उद्धव ठाकरे जाणार असेल तर मीही बारसूला जाणार आहे, तो प्रकल्प हवा आहे दीड लाख कोटींची गुंतवणुकीतून अनेक छोटे मोठ्या प्रकल्पातून होणार असून त्यामध्ये तरुण-तरुणींना रोजगार मिळणार आहे हॉस्पिटल कॉलेज आदी सुविधा त्यातून दिल्या जाणार आहेत.

असे अनेक प्रकल्प सुरू होतात उद्धव ठाकरे यांचे काय जाते, सगळेच नको म्हणतो ,ती मंडळी सध्या बेकार आहे. सोलापूर जिल्ह्यात 44 साखर कारखाने असून जास्तीचे पैसे देण्यासाठी हात आखडता घेतात या विषयावर विचारले असता पत्रकारांनी कधी आंदोलन छेडले का ? जास्तीचे पैसे मिळावेत यासाठी राज्य व केंद्रातून प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

मी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर मंत्रालयात गेल्यानंतर माहिती घेतली असता अडीच वर्षात उद्धव ठाकरे फक्त अडीच तास मंत्रालयात हजर होते.अशी माहिती मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितली.शरद पवारांच्या राष्ट्रवादी अध्यक्षपद सोडण्याचे निर्णयामुळे महाविकास आघाडीची वज्रमूठ आता ढिली होणार आहे असल्याचे सांगितले.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपा प्रवेश करणार का ? या विषयावर त्यांनी मला माहीत नसल्याचे तर विरोधी पक्षनेते अजित पवार हे सीमारेषेवर असल्याचे सांगितले. उद्धव ठाकरे बद्दल प्रश्न विचारले असता पत्रकारांना तुमच्या समोर विकासाचे,बेकारीचे, उत्पन्नाचे प्रश्न नाहीत का ?

प्रति प्रश्न उपस्थित केला मंगळवेढा परिसरात नवोदित उद्योग सुरू करण्यासाठी बँकेकडे आम्हीच प्रस्ताव सादर करणार आहे. नारायण राणे यांच्या सहीने येणारे प्रस्ताव नाकारू नका अशी सूचना देखील दिली जाणार असल्याची त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. यावेळी संस्थेच्या सचिवा प्रियदर्शनी कदम- महाडिक, पवन महाडिक,शशिकांत चव्हाण दीपक चंदनशिवे आदी उपस्थित होते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com