निराधार योजना, सावकारीचा प्रश्न गंभीर

विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली चिंता
Neelam Gorhe
Neelam Gorhesakal

सोलापूर : राज्यात निराधार योजनाच्या लाभार्थींना उत्पन्नाचे निकष व वयाच्या अटीच्या बाबत नव्याने निर्णय घ्यायला हवा. तसेच सावकारीला रोखण्यासाठी आपण राज्य शासनाकडे वास्तव मांडू, अशी माहिती विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोर्हे यांनी दिली. सोलापूर जिल्ह्याच्या दौर्यावर आल्या असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

राज्याच्या निराधारांसाठी असलेल्या कल्याणकारी योजनांच्या बाबतीत अडचणी वाढल्या आहेत. या योजनेतील लाभार्थींना २१ हजार रुपये वार्षिक उत्पन्नाची अट घालण्यात आली आहे. प्रत्यक्षात तलाठी उत्पन्नाची प्रमाणपत्रे देत नाहीत. तसेच वयाची अटीबाबत नव्याने विचार करावा लागणार आहे. राज्यात निराधार योजनाच्या बाबत या अडचणी सोडवण्यासाठी धोरणात्मक निर्णय व्हावेत यासाठी आपण शासनाशी संवाद साधणार आहोत.

राज्यात खासगी सावकारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामध्ये अनेक मार्गाने लोकांना त्रास दिला जातो. आपण स्वतः यापुर्वी प्रयत्न केले होते त्याचे काही परिणाम मिळाले. पण आता सावकारीच्या अऩेक प्रकाराच्या बाबत सक्षम कायदा असणे किंवा नियमांचा काटेकोरपणा असावा यासाठी अजूनही प्रयत्नाची गरज आहे. अधूनमधून सहकार खाते सावकारी रोखण्यासाठी काम करते. पण तरीही सावकारीला वेसन घालण्यासाठी बरेच काही होण्याची गरज आहे असे श्रीमती गोर्हे यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com