गावातच मिळणार सर्वसामान्यांना प्राथमिक उपचार!

गावातच मिळणार सर्वसामान्यांना प्राथमिक उपचार! आता स्वच्छ, सुंदर प्राथमिक आरोग्य केंद्रे
प्राथमिक आरोग्य केंद्र
प्राथमिक आरोग्य केंद्रCanva
Summary

प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन शिफ्टमध्ये प्रत्येकी एक डॉक्‍टर तर, उपकेंद्रांमध्येही बीएएमएस डॉक्‍टर्स नियुक्‍त केले जात आहेत.

सोलापूर : कोरोनापूर्वी (Covid-19) मरगळलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये आता उपचाराची सोय उपलब्ध करून देण्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी (CEO Dilip Swamy) हे यशस्वी झाले आहेत. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन शिफ्टमध्ये प्रत्येकी एक डॉक्‍टर तर, उपकेंद्रांमध्येही बीएएमएस डॉक्‍टर्स (Doctor) नियुक्‍त केले जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना आता गावातच प्राथमिक उपचार मिळणार आहेत.

जिल्ह्यातील जवळपास बाराशे गावांमध्ये 427 प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे, 77 प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. किमान 50 हजार लोकसंख्येसाठी एक प्राथमिक आरोग्य केंद्र तर पाच हजार लोकसंख्येसाठी एक उपकेंद्र असावे, असा निकष आहे. दुसरीकडे, प्रत्येक एक हजार व्यक्‍तींमागे किमान एक डॉक्‍टर असावा, असा जागतिक आरोग्य संघटनेचा मापदंड आहे. परंतु, डॉक्‍टरांची संख्या पुरेशा प्रमाणात नाही. त्यात टप्प्या- टप्प्याने वाढ केली जात आहे. परंतु, जिल्ह्यातील ज्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांना डॉक्‍टरच नव्हते, अथवा एक-दोन आरोग्य केंद्रासाठी एकच डॉक्‍टर असायचा, हा प्रकार आता बंद झाला आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र
ग्रामसुरक्षा यंत्रणेची 'तेजस्वी' वाटचाल! 131 जणांनी बदलली जगण्याची वाट

प्रत्येक आरोग्य केंद्रासाठी दोन डॉक्‍टर तर उपकेंद्रासाठी एक डॉक्‍टर देण्यात आला आहे. त्यांच्या सोबतीला आशासेविका असतील. त्यातून लसीकरण, प्राथमिक उपचार, आरोग्य तपासणीचे कार्यक्रम पार पाडणे सोयीचे होईल. दरम्यान, आता स्वच्छ व सुंदर शाळा या अभियानाच्या धर्तीवर "स्वच्छ व सुंदर प्राथमिक आरोग्य केंद्र' ही मोहीम राबविली जाणार असल्याचेही स्वामी यांनी या वेळी स्पष्ट केले. उपचाराअभावी कोणत्याही रुग्णाचे हाल होणार नाहीत, याची दक्षता घेतली जाईल, असे नियोजन केल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. त्यासाठी त्यांनी राज्य सरकारसह जिल्हा नियोजन समितीकडे निधीची मागणी केली आहे.

खेड्यापाड्यातील सर्वसामान्यांना गावातच प्राथमिक उपचार मिळायला हवेत. त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांबरोबरच उपकेंद्रांसाठीही डॉक्‍टरांची नियुक्‍ती केली आहे. आगामी काळात त्यात खूप मोठे बदल होतील.

- दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर

ग्रामीण आरोग्याची स्थिती...

एकूण प्राथमिक आरोग्य केंद्रे : 77

प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे : 427

दरवर्षी प्रथमोपचार घेणारे रुग्ण : 23.49 लाख

आरोग्य केंद्रातील डॉक्‍टर्स : 481

प्राथमिक आरोग्य केंद्र
'राजकारणात कोणाला पाणी पाजायचे असेल तर आपल्याकडे पाणी असावे लागते!'

'ऑक्‍सिजन'मध्ये जिल्हा होतोय स्वयंपूर्ण

जिल्ह्यात दोन उपजिल्हा रुग्णालये तर पाच ग्रामीण रुग्णालये आहेत. कोरोनापूर्वी या दवाखान्यातून केवळ प्राथमिक उपचारच होत होते, असे अनुभव अनेकजण सांगतात. मात्र, आता हे हॉस्पिटल सुसज्ज झाले असून पंढरपूर, करमाळा व बार्शी येथील शासकीय रुग्णालयांचा विस्तार होणार आहे. आनंदाची बाब म्हणजे अकलूज, पंढरपूर, माळशिरस व करमाळा येथील रुग्णालयात हवेतून ऑक्‍सिजन निर्मितीचे प्लॅन्ट उभारले जात आहेत. ऑक्‍सिजन टॅंक उभारले असून प्रत्येक दवाखान्यात 50 जम्बो ऑक्‍सिजन सिलिंडर ठेवले आहेत. प्रत्येक दवाखान्यात किमान दोन बायपॅप मशिन ठेवण्यात आले असून, सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून रुग्णवाहिका, उपचाराची साधने उपलब्ध झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com