दीड हजार स्मार्ट पोलखालीच अंधार! एलईडीचा नुसताच बोलबाला

कंपनीचा वाढीव करारपत्र व थकीत रकमेपोटी पथदिव्यांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊनही ना महापालिकेचे 50 टक्‍क्‍यांनी वीजबिल कमी झाले, ना शहरात दिवे लागले.
 lights
lightsesakal
Summary

कंपनीचा वाढीव करारपत्र व थकीत रकमेपोटी पथदिव्यांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊनही ना महापालिकेचे 50 टक्‍क्‍यांनी वीजबिल कमी झाले, ना शहरात दिवे लागले.

सोलापूर: शहर हद्दवाढ भागातील स्मार्ट पोल अन्‌ एलईडी दिव्यांचा नुसताच बोलबाला सुरू असून, शहर अद्यापही अंधारातच आहे. हद्दवाढ भागातील तब्बल दीड हजार पोल हे दिव्याविनाच उभे आहेत. कंपनीचा वाढीव करारपत्र व थकीत रकमेपोटी पथदिव्यांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊनही ना महापालिकेचे 50 टक्‍क्‍यांनी वीजबिल कमी झाले, ना शहरात दिवे लागले.

 lights
सोलापूर विभागांतील एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्ड धारकांना मिळणार लाभ

सोलापूर शहरासह हद्दवाढ भागात महापालिका, वीजवितरण महामंडळ आणि स्मार्ट सिटी यांच्याकडून पथदिव्यांचे पोल उभारण्यात आले आहेत. यामध्ये वीज महामंडळांच्या पोलची संख्या अधिक आहे. या सर्व पोलवर महापालिकेकडून बल्ब, ट्यूब बसविण्यात येऊन त्याचे बिल मात्र महापालिका भरते. संपूर्ण शहरात एलईडी दिव्यांच्या प्रकाशाने उजळून टाकण्यासाठी महापालिकेने केंद्र शासनाच्या ईईएसएल या कंपनीला 2018 मध्ये कामाचा मक्‍ता दिला. एलईडी दिव्याच्या माध्यमातून दरमहा बचत होणारी रक्‍कम या कंपनीला देण्याचा करार होता. शहरात आतापर्यंत एकूण 48 हजार 506 पथदिवे बसविण्यात आले आहेत. वाढीव दिव्यांचे करारपत्र न झाल्याने त्यातील 1 हजार 500 पथदिवे हे एलईडीविनाच उभे आहेत. तर जेथे एलईडी दिवे बसविले तेथील कंट्रोलिंग हे कंपनीच्या हाती आहे. एप्रिल महिन्यापासून कंपनीचे बिले अदा न केल्याने वारंवार हद्दवाढ भागातील बत्ती गूल होते. गेल्या दोन वर्षात महापालिका एलईडी दिव्यांवर कोट्यवधी रुपये खर्च केले. तसेच पथदिव्यांचे वीजबिलाचे मीटरही चालू आहे. मात्र स्मार्ट शहरातील नागरिक अजूनही अंधारातच आहे.

 lights
सोलापूर: 'बुडत्याला काडीचा तसा पुरात अडकलेल्यांना दोरीचा आधार'

यामुळे पसरलाय अंधार

- ईएसएसएल कंपनीला 42 हजार एलईडी बसविण्याचे काम दिले

- 10 डिसेंबर 2018 ला मक्‍ता देण्यात आला

- प्रत्यक्ष काम जानेवारी 1019 पासून सुरू झाले

- 80 टक्‍के पथदिवे बसविण्याचे काम पूर्ण

- नव्याने 4 हजार 500 स्मार्ट सिटीतील पथदिव्यांची भर पडली

- या पथदिव्यांसाठी वाढीव करारपत्रक महापालिकेने केले नाही. व एप्रिल महिन्यापासून वीज बचतीचे पैसेही दिले नाही. त्यामुळे शहरातील दिवे बंद अवस्थेत आणि पोल दिव्याविनाच आहेत.

शहरातील पूर्वीच्या पथदिव्यांची संख्या

- एकूण पोल संख्या - 44 हजार

- एमएसईबीचे पोल संख्या - 38 हजार

- महापालिकेचे पोल - 6 हजार

 lights
सोलापूर: कुरनुर धरणातून विसर्ग 2700 क्यूसेक्स वेगाने सुरु

सध्या शहरात एकूण पथदिव्यांची संख्या

- एकूण पथदिवे - 48 हजार 500

- पूर्वीचे पथदिवे - 44 हजार

- स्मार्ट सिटीचे पथदिवे - 4 हजार 500

- नव्याने प्रस्तावित - 2 हजार 500 पथदिवे

असा हा ईईएसएल कंपनीचा करार

- कंपनीचा एलईडीमुळे 50 टक्‍के वीजबचतीचा दावा

- शहरातील पोलवरील जुने दिवे काढून नवे एलईडी दिवे बसविणे

- एलईडी दिव्यांच्या माध्यमातून दरमहा झालेल्या वीज बचतीचे पैसे महापालिकेने कंपनीला दरमहा द्यावे

- सात वर्षांपर्यंत बचतीचे दरमहा पैसे देणे बंधनकारक

- सात वर्षे देखभाल व दुरुस्ती कंपनीकडे राहणार

बातमीदार: प्रमिला चोरगी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com