डीजे वाजवून परतत असताना टेम्पो पलटी; एकाचा मृत्यू

सोलापूर येथील आंबेडकर जयंतीतील कार्यक्रमातील डी. जे. वाजवून परतत असताना भरधाव वेगातील डी.जे. चा टेम्पो पलटी होऊन झालेल्या अपघातात चौघे जण जखमी, तर एकाचा जागीच मृत्यू
Accident News
Accident Newssakal
Summary

सोलापूर येथील आंबेडकर जयंतीतील कार्यक्रमातील डी. जे. वाजवून परतत असताना भरधाव वेगातील डी.जे. चा टेम्पो पलटी होऊन झालेल्या अपघातात चौघे जण जखमी, तर एकाचा जागीच मृत्यू

मंगळवेढा - सोलापूर येथील आंबेडकर जयंतीतील कार्यक्रमातील डी.जे. वाजवून परतत असताना भरधाव वेगातील डी. जे. चा टेम्पो (DJ Tempo) पलटी (Reversal) होऊन झालेल्या अपघातात (Accident) चौघे जण जखमी, (Injured) तर एकाचा जागीच मृत्यू (Death) झाल्याची घटना आज पहाटे 3.30 वाजता घडली. मृतावर शवविच्छेदन करण्यासाठी ताटकळत ठेवण्यात आल्याने नातेवाईकांना मंगळवेढ्यातील आरोग्य खात्याबद्दल संताप व्यक्त केला

या घटनेची खबर राहुल कुंडलिक माने (वय 40, रा. धानवड, जिल्हा खानापूर) यांनी दिले असून त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, त्याच्या टेम्पोला सोलापूर येथील आंबेडकर जयंती कार्यक्रमासाठी मिरवणुकीसाठी डी.जे. ला सुपारी 17 एप्रिल साठी मिळाली होती. सदर मिरवणुकीतील कार्यक्रम संपल्यानंतर आंधळी, ता. पलूस, जि.सांगली येथे जाण्याकरता टेम्पो क्रमांक एम एच 14 व्ही 451 मधून रत्नागिरी-नागपूर या महामार्गावरून जात असताना मंगळवेढा ते सांगोला रोडवर चाळीस धोंडा येथे भरधाव वेगाने जाणाय्रा टेम्पोने कडेला असणाऱ्या फुलांच्या कठड्याला धडकून पलटी झाला. त्यावेळी झोपेत असलेले अभिजित बाळासाहेब शिंदे, विशाल उत्तम चव्हाण, संदीप लक्ष्मण माने, मनोज जनार्दन पवार, यश उर्फ गुंड्या राहुल माने हे टेंपोतून फेकले गेले त्यामधील यश माने याच्या अंगावर टेम्पोचे हौदे पडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

बाकी जखमींना उपचारासाठी मंगळवेढ्यातील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातामध्ये 50 हजार रुपये टेम्पोचे नुकसान झाले असून भरधाव वेगाने वाहन चालवून चौघाला जखमी व एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी चालक अनिकेत शिंदे यांच्याविरोधात फिर्याद देण्यात आली. महामार्गावरील एखाद्या अपघातामध्ये मृत्यू झाल्यानंतर मृतावर शवविच्छेदन करण्यासाठी आंधळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शवविच्छेदन कक्ष नसल्यामुळे शवविच्छेदनासाठी गैरसोय होत असल्याचे वृत्त दैनिक सकाळने प्रसिद्ध केले होते. परंतु जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग गेले काही वर्षापासून निद्रिस्त अवस्थेत असल्यामुळे याही अपघातातील मृत झालेल्या यशला शवविच्छेदन करण्यासाठी मंगळवेढा येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यास विलंब झाल्यामुळे मृताच्या नातेवाईकांना भर उन्हात दिवसभर मंगळवेढ्यातील निष्क्रिय आरोग्यसेवेचा मनस्ताप सहन करावा लागला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com