अज्ञात वाहनाच्या धडकेने शिराळे हद्दीत एकाचा मृत्यू

जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला
Vasant Ekal
Vasant EkalSakal

पांगरी - अज्ञात वाहनचालकाने त्याच्या ताब्यातील वाहन अतिवेगाने व निष्काळजीपणे चालवून एका व्यक्तीस जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (गुरुवारी) सकाळी सातच्या सुमारास बार्शी-येरमाळा रस्त्यावर शिराळे (ता.बार्शी) गावच्या हद्दीत उघडकीस आली.

वसंत ज्ञानदेव ऐकल (वय ५२ रा.इंचलकरंजी) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत रेखा नंदकुमार चंदनशिवे (पोलिस पाटील शिराळे) यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आज सकाळी सातच्या सुमारास कोणत्यातरी अज्ञात वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन अतिवेगाने व निष्काळजीपणे चालवून वसंत ज्ञानदेव ऐकल यांना जोराची धडक दिल्याने त्यामध्ये त्यांचे गुडघ्यापासून दोन्ही पाय चेंदामेंदा झाले व डोक्याच्या पाठीमागील बाजूस जोरदार मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेला अज्ञात वाहनचालक अपघातानंतर जखमीला तेथेच सोडून पळून गेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com