esakal | होम डिलिव्हरीसाठी परवानगी मिळवायचीय का? अशी करा नोंदणी

बोलून बातमी शोधा

Home Delivery

होम डिलिव्हरीसाठी परवानगी मिळवायचीय का? अशी करा नोंदणी

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : राज्य शासनाच्या आदेशानुसार कोरोनाच्या कडक संचारबंदी काळात होम डिलिव्हरीसाठी व्यक्ती अथवा हॉटेल, ई-कॉमर्ससह अन्य लोकांना ये-जा करण्यासाठी महापालिकेच्या वतीने ई-पास दिले जात आहेत. घरपोच सेवा देणाऱ्यांसाठी एकूण 773 अर्ज प्राप्त झाले होते. त्यामध्ये 647 अर्जांची छाननी पूर्ण झाली असून त्यापैकी 358 जणांना ई-पास देण्यात आले आहेत. 289 अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत.

होम डिलिव्हरीची सेवा देण्यासाठी संबंधितांना ऑनलाइन अर्ज करताना त्यांनी फोटो, आधार कार्ड व आरटीपीसीआर चाचणी केल्याचे प्रमाणपत्र अपलोड करणे बंधनकारक आहे. मात्र, कोरोना टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह असावा, अशी अट आहे. काही अर्जदारांचे प्रमाणपत्र नाहीत तर कोणाचे परवानेच नाहीत. त्यामुळे अनेकांचे अर्ज नामंजूर झाल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शहरातील हॉटेल्स, ई-कॉमर्सच्या आस्थापनांनी अर्ज करताना घरपोच सेवा देणाऱ्या व्यक्तीचा फोटो, आधार कार्डसह अन्य कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करावीत; जेणेकरून अर्ज नामंजूर होणार नाही, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: कोरोना मृतांच्या कारणांचा घेतला जाणार शोध ! आयुक्‍तांनी नेमली डेथ ऑडिट कमिटी

नोंदणी झाल्यानंतर अर्जाची छाननी महापालिकेतर्फे होईल. त्यानंतर संबंधितांना ऑनलाइन पास वितरीत केला जातो. ई-पास मिळविण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. त्यांनी महापालिकेच्या वेबसाईटवर ऑनलाइन नोंदणी करावी. www.solapurcorporation.gov.in या वेबसाईटवर वरील बाजूला ई-पास ऍप्लिकेशन फॉर होम डिलिव्हरी या लिंकवर क्‍लिक करावे. त्यानंतर पुढील पर्याय निवडून फोटो, कागदपत्रे अपलोड करावीत, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.

नोंदणीसाठीचे टप्पे...

  • www.solapurcorporation.gov.in ही वेबसाईट ओपन करा

  • वेबसाईटवर वरील बाजूला ई-पास ऍप्लिकेशन फॉर होम डिलिव्हरी या लिंकवर क्‍लिक करा

  • पुढील पर्याय निवडून विविध टप्प्यांवर आवश्‍यक ती कागदपत्रे अपलोड करा

  • अर्ज भरल्यानंतर एक मेसेज येईल; त्यानंतर महापालिकेकडून ई-पास मिळेल