
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन वाढविण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती मोहोळ शाखेने विद्यार्थ्यांचा 'तालुकास्तरीय विज्ञान महोत्सव
अंधश्रद्धा निर्मूलन समिती मोहोळ शाखेने मोहोळ येथे "विज्ञान महोत्सवाचे" आयोजन
मोहोळ : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन वाढविण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती मोहोळ शाखेने विद्यार्थ्यांचा 'तालुकास्तरीय विज्ञान महोत्सव' घेतला असल्याची माहिती राज्यचिटणीस सुधाकर काशिद यांनी दिली.
28 फेबुवारी हा 'विज्ञानदिन' शाळांमध्ये राबवून दशसुत्री कार्यक्रमातील पूरक उपक्रमामध्ये भर घालण्यासाठी उच्च प्राथमिक शाळेतील व माध्यामिक शाळेतील विद्यार्थ्यांना विज्ञानातील सोपे प्रयोग,विज्ञान गीते शिकविण्यात आली.
हेच विद्यार्थी म्हणजे 'विज्ञानदूत' शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना 28 फेब्रुवारी रोजी प्रयोग करून दाखवतील व विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा मोहोळने केले होते.
मोहोळ येथील प्राथमिक शिक्षक सहकारी.पतसंस्थेच्या सभागृहात विज्ञान महोत्सव कार्यशाळे साठी डॉ.शैलेश झाडबुके, डॉ.सानिका झाडबुके,डॉ.सचिन राऊत महाराष्ट्र अंनिस राज्य सरचिटणीस सुधाकर काशीद आदि प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
रमेश अदलिंगे, धर्मराज चवरे यांनी मुलांना गुरुत्त्वमध्य,जडत्त्व,केशाकर्षण, हात चलाखीचे प्रयोग शिकवले. यावेळी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील तीस शिक्षक व 70 विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी पैगंबर तांबोळी यांनी आकाशातील ग्रह ,तारे व राशी निरिक्षणा विषयी माहिती दिली.संजय भोसले यांनी प्रास्ताविक केले,तर रमेश अदलिंगे यांनी आभार मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र मोटे, मनोहर गोडसे, रमेश साठे, तुषार मोटे, यांनी परिश्रम घेतले.