"प्लीज एक बेड बघा ना, व्हेंटिलेटरवर आमचा माणूस पाठवायचा आहे !'

कोरोना रुग्णांचे हाल पाहून लोकप्रतिनिधीही हतबल झाले आहेत
corona
coronaMedia Gallary

नातेपुते (सोलापूर) : "रेमडेसिव्हीर मिळतील का?... प्लीज एक बेड बघा ना, व्हेंटिलेटरवर आमचा माणूस पाठवायचा आहे... तेवढं डॉक्‍टर लोकांशी बोला ना... असे दिवसाला शेकडो फोन मला व आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांना येत आहेत. कुणी माझे मार्गदर्शक तर कुणी माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्यासोबत काम करणारे सहकारी मित्र... सगळी माझ्या हक्काची माणसं... प्रयत्न तर शंभर टक्के चालू आहेत; पण...' अशी भावनिक पोस्ट माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी सोशल मीडियावर केली आहे.

यावरून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लोकप्रतिनिधीही हतबल झाल्याचे दिसून येते. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी तालुक्‍यातील जनतेला सोशल मीडियावर जाहीर पत्राद्वारे आपली कोरोना संदर्भातील हतबलता प्रकट करून, जनतेने जास्तीत जास्त काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. शेवटी ते म्हणतात, प्रयत्न तर शंभर टक्के चालू आहेत; परंतु सर्वत्र आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे, हे सभोवतालची परिस्थिती बघून आपणासही कळत असेलच. ऑक्‍सिजन बेड नाही, व्हेंटिलेटर नाही, रेमडेसिव्हीर नाही. कोणाला बेड न मिळाल्यामुळे दवाखान्याबाहेर जीव सोडावा लागतो आहे, तर कोणाला दवाखान्यात सुविधांअभावी. गेटवर 10-10 तास रुग्णवाहिका रुग्णांना घेऊन प्रतीक्षेत उभ्या आहेत.

corona
पंढरपूर पोटनिवडणुकीत कोण मारणार बाजी? साखर सम्राट की तिसराच !

सगळ्यांना मनापासून मदत करायची इच्छा असूनही नाइलाजाने ऑक्‍सिजन बेड, इंजेक्‍शनही उपलब्ध होत नाहीत. प्रयत्न करतोय, असं उत्तर द्यावं लागतंय. आम्ही लोकप्रतिनिधी सुद्धा प्रचंड हतबल झालो आहोत. मित्रांनो, काळजी घ्या, सुरक्षित राहा. हेही दिवस निघून जातील.

माळशिरस तालुक्‍यातील आरटीपीसीआरच्या चाचण्या सोलापूरला पाठवण्याची दररोज सोय होती. परंतु, आठवड्यातून एक किंवा दोन वेळा सोलापूरला जाण्यासाठी सोय होत असल्याने रुग्णांना आपला रिपोर्ट आठ- आठ दिवस समजत नाही. त्यामुळे रुग्ण जनतेत फिरत आहेत.

बातमीदार : सुनील राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com