esakal | कोंबडवाडीत हातभट्टीवर छापा
sakal

बोलून बातमी शोधा

Gambling police action

कोंबडवाडीत हातभट्टीवर छापा

sakal_logo
By
राजकुमार शहा

मोहोळ : कोंबडवाडी (अनगर) (ता. मोहोळ) येथील हातभट्टी दारू अड्ड्यावर शनिवारी (ता. 4) मोहोळ पोलिसांनी छापा टाकून हातभट्टी अड्डा उद्‌वस्त केला. यावेळी पोलिसांनी विषारी रसायनासह एक लाख 9 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी मोहोळ पोलिसात 6 जणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितामध्ये 4 महिलांचा देखील समावेश आहे.

हेही वाचा: सोलापूरच्या पुनर्वसन विभागात दलालांचा सुळसुळाट !

निलाबाई ऊर्फ अलका अर्जुन पवार, लता प्रल्हाद पवार, पूजा दत्तात्रय पवार, राणी संतोष पवार, मच्छिंद्र हेमला पवार, बबन हुरजा पवार (सर्व रा. कोंबडवाडी, अनगर ता. मोहोळ) अशी गुन्हा दाखल झालेला संशयितांची नावे आहेत. मात्र पोलिस आल्याची चाहूल लागल्याने संशयीत पळून जाण्यात यशस्वी झाले.

हेही वाचा: वाळूज : बैलपोळ्याच्या साहित्य विक्रीला बाजारात ठंड प्रतिसाद

या बाबत मोहोळ पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कोंबडवाडी (अनगर) येथे पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांच्यासह सहाय्यक पोलिस निरीक्षक आशुतोष चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक संतोष माने, सुधीर खारगे, सहाय्यक फौजदार बाळासाहेब शेलार, लोबो चव्हाण व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने दुपारी दोन वाजता कोंबडवाडी येथे छापा टाकला. यावेळी 4 महिला व दोन पुरुष घराच्या पाठीमागे बॅरलमध्ये विषारी रसायने वापरून हातभट्टी दारू तयार करीत असल्याचे निदर्शनास आले.

हेही वाचा: गणेशोत्सवामुळे बाजारपेठेत होणाऱ्या उलाढालीवर कोरोनाचे सावट

पोलिस पथकाने घटनास्थळावरुन तब्बल 3 हजार 800 लिटर विषारी रसायन,80 लिटर आंबट उग्र वासाची हातभट्टी दारू, सहा लोखंडी बॅरल व सहा लोखंडी पाट्या असे एकूण एक लाख 9 हजार 700 रुपयांचे साहित्य जप्त केले. या प्रकरणी पोलिस नाईक प्रवीण साठे, यांनी सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक आशुतोष चव्हाण हे करीत आहेत.

loading image
go to top