लैंगिक अत्याचार करून 16 महिन्याच्या पोटच्या चिमुकलीचा खून! नराधम बापासह आई जेरबंद | Crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लैंगिक अत्याचार करून 16 महिन्याच्या पोटच्या चिमुकलीचा खून!
लैंगिक अत्याचार करून 16 महिन्याच्या पोटच्या चिमुकलीचा खून! नराधम बापासह आई जेरबंद

लैंगिक अत्याचार करून 16 महिन्याच्या पोटच्या चिमुकलीचा खून!

सोलापूर : हैदराबाद (Hyderabad) येथे बापलेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका नराधम बापाने आपल्या अवघ्या 16 महिन्यांच्या पोटच्या मुलीवरच लैंगिक अत्याचार केला. इतकेच नव्हे तर त्याने तिला गळा दाबून ठार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. त्या नराधम बापाच्या या लाजिरवाण्या व संतापजनक कृत्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या कामात मदत करणाऱ्या पत्नीलाही सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी (Solapur Railway Police) अटक केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. (Police have arrested a mother and father for abusing their daughter)

हेही वाचा: डिसेंबरमध्ये 'या' राज्यातील लोकांनी रिचवली 50 हजार लिटर दारू!

सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या आई-वडिलांसह हैदराबाद येथे राहात होती. पीडितेची आई व लहान मुलगा हे झोपी गेले असताना बापाने मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली. यानंतर सिकंदराबाद- राजकोट एक्‍सप्रेसने (Secunderabad-Rajkot Express) पुरावा नष्ट करण्यासाठी आपल्या मूळगावी राजस्थानकडे (Rajasthan) मुलीचा मृतदेह घेऊन जात असताना सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी संशयित आरोपी आणि त्याच्या पत्नीस ताब्यात घेतले.

सिकंदराबाद- राजकोट एक्‍सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना संशय आला असताना प्रवाशांनी वाडी येथे पोलिसांशी संपर्क साधला. मात्र, गाडी वाडी स्थानकावर जास्त वेळ न थांबल्याने पुढे मार्गस्थ झाली. ही गाडी सोलापूर रेल्वे स्थानकावर (Solapur Railway Station) गुरुवारी (ता. 6) पहाटे 4 वाजता आल्यानंतर लोहमार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे क्रूर बापाची व त्याला या कृत्यात मदत करणाऱ्या आईची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. लोहमार्गचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल गवळी (वय 41, रा. सोलापूर) यांनी लोहमार्ग पोलिसांत फिर्याद दिली आहे.

हेही वाचा: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग अ‍ॅक्‍शन मोडवर!

सदरील गुन्हा हा हैदराबाद पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक गणेश शिंदे यांनी दिली. पोलिस अधीक्षक (लोहमार्ग, पुणे) सदानंद वायसे- पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक लोहमार्ग पुणे गणेश शिंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी लोहमार्ग विभाग सोलापूर अप्पासाहेब चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top