esakal | दिव्यांग तरुणीवर अत्याचार ! दोन तरुणांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

क्राईम न्यूज

दिव्यांग तरुणीवर अत्याचार ! दोन तरुणांना अटक

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

शहरातील एका दिव्यांग तरुणीवर दोन तरुणांनी मिळून आळीपाळीने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

सोलापूर : शहरातील एका दिव्यांग तरुणीवर दोन तरुणांनी मिळून आळीपाळीने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोहेल इमाम साब आत्तार व गणेश शंकर कोरे असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. पीडित तरुणीने पोलिसांत त्यांच्याविरुद्ध फिर्याद दिली. पोलिसांनी त्या दोघांनाही अटक केली आहे. (Police have arrested two youths for abusing a disabled girl-ssd73)

हेही वाचा: आम्हाला सर्दी, पडसं अन्‌ खोकला काहीही त्रास नाही !

तरुणीच्या घरी कोणी नसताना सोहेल व गणेश या दोघांनी घरात प्रवेश केला. पीडित तरुणी पायाने दिव्यांग असल्याचा गैरफायदा घेऊन त्यांनी घरात येऊन आळीपाळीने जबरदस्तीने अत्याचार करून शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर "याबाबत तू कोणाला सांगितले तर बघ' असे म्हणून त्यांनी तरुणीला दमदाटी केली, असेही फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक मोरे (Assistant Inspector of Police More) तपास करीत आहेत.

गणेश हा जनावरे राखतो तर सोहेल हा फळविक्री करतो, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पवार (Senior Inspector of Police Sanjay Pawar) यांनी दिली. दरम्यान, घरात कोणी नसल्याची संधी साधून त्या दोघांनी तरुणीवर अत्याचार केला. मागील काही दिवसांपासून त्यांनी अत्याचार केल्याचे पीडितेने सांगितले. तर तरुणीच्या घरातील लोक मजुरीसाठी बाहेर गेल्यानंतर ते दोघेही घरी येऊन आळीपाळीने अत्याचार करत होते, ही बाब प्राथमिक तपासात समोर आली आहे. त्या दोघांनाही पोलिसांनी अटक केली असून आज त्यांना न्यायालयात हजर केले जाणार असल्याचेही पोलिस सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा: माढा सबजेलमधून गंभीर गुन्ह्यातील चार कैदी पळाले! शोधमोहीम सुरू

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

शहरातील 15 वर्षीय तरुणीला कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याची घटना 18 जुलैला घडली. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्‍तीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तत्पूर्वी, रविवारी (ता. 18) पहाटेच्या सुमारास त्या अल्पवयीन मुलीला कायदेशीर रखवालीतून कोणीतरी फूस लावून पळवून नेले, अशी फिर्याद दाखल झाली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन पेटकर तपास करीत आहेत.

loading image