पोलिसांनी टेम्पोसह तीस लाखाची सुगंधित तंबाखू व पान मसाला पकडला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

flavored tobacco

पानमसाला घेऊन निघालेला आयशर टेम्पो अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पकडला असून, टेम्पो सह तीस लाखाचा माल जप्त केला.

पोलिसांनी टेम्पोसह तीस लाखाची सुगंधित तंबाखू व पान मसाला पकडला

मोहोळ - बिदर येथून शिरूर कडे पानमसाला घेऊन निघालेला आयशर टेम्पो अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पकडला असून, टेम्पो सह तीस लाखाचा माल जप्त केला आहे. या प्रकरणी चौघाजणा विरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. शोएब सय्यद समशुद्दीन रा गंगान हल्ली बेंगलोर, इरशाद अहमद खान रा शिरूर, शाकीर शेख व ऋषभ भटोरा दोघे रा पुणे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, आयशर टेम्पो क्रमांक केए 41/ए 4122 हा बिदर येथून शिरूर कडे निघाला होता. गुप्त बातमीदार मार्फत अन्न व औषध प्रशासनाच्या अन्नसुरक्षा अधिकारी नंदिनी हिरेमठ यांना सदरच्या टेम्पोत पान मसाला असल्याची माहिती मिळाली. माहितीची खातर जमा करण्यासाठी अन्नसुरक्षा अधिकारी श्रीमती नंदिनी हिरेमठ व प्रशांत कुचेकर यांनी मोहोळ शहरापासून जवळच असलेल्या यावली फाटा येथे थांबून सदरचा टेम्पो थांबविला. तो टेम्पो मोहोळ पोलीस ठाण्यात आणला व त्याची तपासणी केली असता, त्यात पांढऱ्या रंगाची 50 पोती आढळून आली.

सदरची पोती फोडली असता त्यात पाकिटे आढळून आली. ती पाकिटे फोडली असता त्यात तंबाखू मिश्रित सुगंधी पान मसाला आढळून आला, त्यात बाराती पान मसाल्याची पंधरा हजार पाकीटे व बाराती सुगंधी तंबाखूची पंधरा हजार पाकिटांचा समावेश आहे. सदरची पाकिटे, पान मसाला व आयशर टेम्पो असा एकूण 30 लाखाचा माल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी अन्नसुरक्षा अधिकारी श्रीमती नंदिनी हिरेमठ यांनी मोहोळ पोलिसात फिर्याद दिली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक सायकर करीत आहेत.

Web Title: Police Seized Flavored Tobacco And Paan Masala Worth Thirty Lakhs Along With Tempo Crime

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..