तेल्या जगू देईना व कुजवा मरु देईना

तेल्या जगू देईना व कुजवा मरु देईना
Summary

डाळींब बागायतदार शेतकरी हवालदिल झाले असून तेल्या व कुजवा या रोगामुळे बहार धरलेल्या डाळींब बागांचे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांचा तर शंभर टक्के डाळिंब बहार वाया गेला आहे.

सलगर बुद्रुक (सोलापूर) : येथील युवा शेतकरी आकाश शिंदे (Akash shinde) यांच्या डाळींब (Pomegranate) बागेतील डाळींबाचे तेल्या व कुजवा या रोगामुळे शंभर टक्के नुकसान (Damage) झाले आहे. त्यामुळे डाळींबाची कच्ची फळे तोडून टाकण्याशिवाय पर्याय नाही. (Pomegranate oil and rot have caused damage)

तेल्या जगू देईना व कुजवा मरु देईना
लस घेतल्यानंतर शरीराला नाणी चिकटण्याची घटना घडली पंढरपुरातही

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी उन्हाळी बहार धरलेल्या डाळींब बागांवर तेल्या व कुजवा या रोगाने जोरदार हल्ला चढवला असून डाळींब बागांचा उन्हाळी बहार वाया जाण्यासारखी परिस्थिती आहे. डाळींब बागायतदार शेतकरी हवालदिल झाले असून तेल्या व कुजवा या रोगामुळे बहार धरलेल्या डाळींब बागांचे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांचा तर शंभर टक्के डाळिंब बहार वाया गेला आहे.

तेल्या जगू देईना व कुजवा मरु देईना
पंढरपुरात अज्ञाताचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

उत्पादन खर्च वाया

छाटणी, बेडगाळणी व इतर मशागतीची कामे, सेंद्रीय व रासायनिक खते तसेच औषध फवारणीचा खर्च धरून हेक्टरी एक ते दीड लाख रुपये इतका खर्च येत असतो. शिवाय पाण्यासाठी केलेला खर्च वेगळाच. अशा परिस्थितीत दरवर्षी तेल्या या बुरशीजन्य रोगामुळे जिल्ह्यातील शेकडो हेक्टर डाळींबाच्या बागांचे जळण होत आहे. अन उत्पादन खर्च ही निघत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

तेल्या जगू देईना व कुजवा मरु देईना
बावची, सलगर खुर्दमध्ये लांडग्याचा थरार! नऊजण जखमी

डाळिंब संशोनध केंद्र असून अडचण नसून खोळंबा

सोलापूर जिल्ह्यत राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र आहे. डाळींबाच्या नवीन जाती विकसित करणे, डाळींबावरील रोगावर औषधे शोधणे तसेच डाळींबावर वेगवेगळी संशोधने करणे, एकंदरीत डाळींब उत्पादक शेतकऱ्यांच्या डाळींब पिकाबाबतच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सोलापुरात राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्राची उभारणी झाली आहे. पण डाळींब संशोधन केंद्राची अवस्था या उलट आहे. डाळींबाचा काळ ठरणाऱ्या तेल्या व कुजवा या रोगामुळे जिल्ह्यातील डाळींब उत्पादक संकटात असताना कोणत्याही प्रकारची मदत संशोधन केंद्राकडून होताना दिसत नाही. तेल्या व कुजवा या रोगावरील औषधे शोधन्याचे संशोधन का होत नाही याचेच संशोधन करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे डाळींब संशोधन केंद्राचे धोरण चुकीचे असल्याचे पहायला मिळत आहे.

तेल्या जगू देईना व कुजवा मरु देईना
भारतात कोरोनाचा दुसरा रुग्ण आढळला, पाहा कोठे?

हेक्टरी अनुदानाची मागणी

दरवर्षी तेल्या व कुजवा या रोगामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे आघाडी सरकारच्या काळात तेल्या रोगासाठी हेक्टरी मदत मिळत होती. तशाच प्रकारची मदत मायबाप सरकारने द्यावी, अशी मागणी डाळींब उत्पादक करत आहेत.

सलगर बुद्रुक येथील डाळींब उत्पादक आकाश शिंदे म्हणाले, माझ्याकडे सहाशे डाळींब झाडे आहेत. मागील वर्षी तेल्या व कुजवा या रोगामुळे खूप नुकसान झाले होते. त्यामुळे या वर्षी उन्हाळी बहार धरला आहे. पण चालू वर्षी संपूर्ण बाग तेल्या व कुजवा मूळे रोगग्रस्त झाली. बागेतील सगळी फळे तोडून उकिरड्यात टाकत आहोत. महाविकास आघाडी सरकारने तेल्या व कुजवा या रोगामुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्याला अनुदान द्यावे. (Pomegranate oil and rot have caused damage)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com