पीपीई किट निर्मितीच अडकली 'रेड झोन'मध्ये; दिवसा पाच हजारांचे लक्ष्य, उत्पादन मात्र फक्त 300

PPE kit production stuck in red zone
PPE kit production stuck in red zone

सोलापूर : देशात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन त्याच्याशी सामना करणाऱ्या डॉक्टरांसाठी अत्यंत आवश्‍यक असणारे पीपीई किट तयार करण्यासाठी सोलापूरमधील गारमेंट असोसिएशनला मफतलाल फॅब्रिकसच्या सहकार्याने परवानगी मिळाली. किटची तीव्र गरज ओळखून 'मफतलाल'ने दिवसा पाच हजार किटचे लक्ष्य ठेवले. परंतु सोलापूर शहरच रेड झोनमध्ये गेल्याने त्यावर परिणाम झाला आहे. सध्या दिवसाला फक्त ३०० किट तयार होत आहेत. त्यामुळे मागणीच्या प्रमाणात पीपीई किट देणे शक्य होत नसल्याचे समोर येत आहे.

हेही वाचा : ... आणि त्यांचा बीपी नॅार्मल झाला आणि आई-वडीलही ठणठणीत
कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी प्रायमरी व वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी सेकंडरी पर्सनल प्रोटेक्शन किटची (पीपीई) निर्मिती सोलापुरातील गारमेंट असोसिएशनने केली आहे. या किटला सोलापूर जिल्हा, महाराष्ट्रासह इतर राज्यांतील डॉक्टरांकडूनही दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. त्यामुळे गारमेंट असोसिएशनने दररोज पाच हजार किट निर्मितीचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र सध्या एकाच फॅक्टरीमध्ये 20 ते 22 मशिनवर दररोज 300 पीपीई किटची निर्मिती होत आहे. मागणी तसा पुरवठा करण्यासाठी गारमेंट असोसिएशनने 14 अतिरिक्त फॅक्टऱ्यांचे सेटअप तयार करून ठेवले आहे. मात्र सोलापुरातील वाढत्या कोरोना रुग्णांमुळे सध्या महापालिका क्षेत्रात कुठल्याही उद्योगात उत्पादनाला मान्यता किंवा परवानगी दिली जात नाही. अशा परिस्थितीत महापालिका हद्दीत असलेल्या अक्कलकोट रोड एमआयडीसीमध्ये गारमेंट असोसिएशनच्या अनेक फॅक्टऱ्या आहेत. तेथे पीपीई किट तयार करण्याच्या पायाभूत सुविधा तयार आहे. मात्र महापालिका क्षेत्रात आता या उत्पादनाला परवानगी मिळत नसल्यामुळे एकाच फॅक्टरीमधून 'पीपीई'ची निर्मिती सुरू आहे. महापालिकेच्या हद्दीबाहेर निर्मिती करायचे ठरल्यास नव्याने सेटअप करणे इतक्यात शक्य नाही.

हेही वाचा : सोलापुरात चार नवीन कोरोना बाधित
कोरोना संसर्गाची भीती सामान्य माणसांसह डॉक्टरांमध्येही निर्माण झाली आहे. आज डॉक्टर पीपीई किटशिवाय ओपीडीमध्ये जायला तयार नाहीत. अशावेळी डॉक्टरांच्या सुरक्षेशी संबंधित अत्यावश्यक अशा पीपीई किटच्या निर्मितीसाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी व उत्पादकांनी एकत्र बसून निर्णय घ्यायला हवा. आज अनेक डॉक्टर पीपीई किटची वाट पाहताहेत. अनेकांकडून मागणी होत आहे. मात्र उत्पादन त्या प्रमाणात घेता येत नसल्याने गारमेंट असोसिएशनसुद्धा हतबल झाले आहे. 

मालकांना परवडणारे नसते...
पीपीई किटची निर्मिती देशासाठी अत्यावश्यक बाब बनली आहे. हे दर्जेदार उत्पादन तयार करण्यासाठी कौशल्य लागते. कारण पीपीई किट हे डॉक्टरांच्या सुरक्षेशी निगडित आहे. महापालिकेबाहेर फॅक्टरी हलवणे सोपे नाही. तिथे कामगार यायला तयार नसतात तसेच तेथे कामगारांना राहण्याची व जेवणाची व्यवस्था करणे मालकालाही परवडणारे नसते. अक्कलकोट रोड एमआयडीसी येथे पूर्ण सेटअप तयार आहे. मात्र कोरोना रुग्ण सगळीकडे वाढल्यास खूपच अवघड परिस्थिती निर्माण होईल. अशा परिस्थितीत डॉक्टरांपर्यंत पीपीई किट पोचवणे सध्या अत्यावश्यक आहे. 'सकाळ'मधून प्रसिद्ध झालेले वृत्त राज्यांमध्ये पोचले असून सगळीकडून खूप मोठ्या प्रमाणात पीपीई किटला मागणी वाढली आहे. 
- अमित जैन, 
संचालक, श्री सोलापूर रेडिमेड कापड उत्पादक संघ

हेही वाचा : डॉक्‍टर नर्स नंतर कोरोनाच्या विळख्यात सोलापुरातील नगरसेवकही
कोरोना या महाभयंकर विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून आम्ही मंगळवेढ्यातील डॉक्टरांनी पुणे-मुंबई येथे पीपीई किटची मागणी केली, मात्र उपलब्ध झाले नाही. राज्याचे माजी उद्योगमंत्री सुभाष देशमुख यांच्या सहकार्याने सोलापुरातून आयसीएमआरच्या मानकानुसार दर्जेदार 100 सेकंडरी व 20 प्रायमरी किट माफक दरात उपलब्ध झाले आहेत. यापुढील काळातही प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्यास पीपीई किट व मास्कशिवाय रुग्णांवर उपचार करणे धोक्याचे ठरू शकते, त्यामुळे पीपीई किटला निरंतर मागणी राहणार आहे. त्यानुसार त्याचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात व्हायला हवे.
- डॉ. शरद शिर्के, 

स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्रतज्ञ, मंगळवेढा
सध्याची परिस्थिती लोकांचे जीव वाचवणे याला प्राधान्य आहे. पीपीई किट अत्यावश्यक आहे, मात्र महापालिका हद्दीबाहेर कामगार नेऊन तेथेच राहायचे व तेथेच सुरक्षेच्या मापदंडानुसार उत्पादन करायचे, असे शासनाचे आदेश आहेत. महापालिका हद्दीबाहेर उद्योग सुरू करण्यासाठी ऑनलाइन पोर्टलवर अर्ज करू शकता. शासनाचे धोरण आहे, की सर्व उद्योग सुरू व्हायला हवेत, मात्र बंदी घातलेला परिसर सोडून.
- बाळासाहेब यशवंते, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, सोलापूर

यामुळे निर्माण झाल्या अडचणी
गारमेंट असोसिएशनचे लक्ष्य दिवसा पाच हजार पीपीई किट निर्मितीचं होतं. त्यासाठी 25 फॅक्टऱ्या तयार ठेवण्यात येऊन तात्पुरत्या स्वरूपात एका फॅक्टरीसाठी किट निर्मितीचा परवाना घेण्यात आला व 21 एप्रिलपासून प्रत्यक्षात उत्पादन सुरू झाले. 'ई-सकाळ'मध्ये याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक राज्यांतून किटची मागणी वाढली. तेव्हा इतर 14 फॅक्टऱ्यासाठी परवानगी मागण्यात आली, मात्र तोपर्यंत सोलापूर शहरात 20 हून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली अन इतर फॅक्टऱ्यांच्या परवानगीमध्ये अडचणी सुरू झाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com