20 ऑक्‍टोबरपासून महाविद्यालयांत प्रॅक्‍टिकलचे वर्ग!

20 ऑक्‍टोबरपासून महाविद्यालयांत प्रॅक्‍टिकलचे वर्ग! कुलगुरू डॉ. फडणवीस यांची माहिती
file photo
file photoGallery
Summary

एका बॅचमध्ये फक्त 20 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. कोव्हिड - 19 चे दोन डोस पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच या उपक्रमात प्रत्यक्ष सहभागी होता येणार आहे.

सोलापूर : राज्य शासनाने 20 ऑक्‍टोबर 2021 पासून महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने (Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University) महाविद्यालयात नियमित वर्ग सुरू न करता सुरवातीला फक्त प्रॅक्‍टिकलचे वर्ग घेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस (Dr. Mrinalini Fadnavis) यांनी दिली.

file photo
शिक्षक, मुख्याध्यापक व अधिकारी निबंध स्पर्धेचे निकाल घोषित

राज्य शासनाच्या निर्देशानुसार कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कोव्हिड टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली. या बैठकीत विद्यापीठ व संलग्न महाविद्यालये सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानुसार महाविद्यालयातील थेअरी तासिका पूर्वीप्रमाणेच ऑनलाइन पद्धतीने सुरू असणार आहेत. मात्र प्रात्यक्षिक वर्ग, प्रोजेक्‍ट वर्क, फिल्ड वर्क आदी शैक्षणिक बाबी या ऑफलाइन पद्धतीने सुरू होणार आहेत. यासाठी एका बॅचमध्ये फक्त 20 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. कोव्हिड - 19 चे दोन डोस पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच या उपक्रमात प्रत्यक्ष सहभागी होता येणार आहे.

महाविद्यालयांनी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे लसीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महाविद्यालयांना कोव्हिड - 19 संबंधित शासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. ऑफलाइन पद्धतीने महाविद्यालय सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना विद्यापीठामार्फत देण्यात येणार आहेत.

file photo
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने जाहीर केली अप्रेंटिसशिप पदांची भरती!

या बैठकीस प्र. कुलगुरू डॉ. डी. एन. मिश्रा, प्र. कुलसचिव डॉ. सुरेश पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर, डॉ. व्ही. बी. पाटील, डॉ. विकास घुटे, डॉ. माया पाटील, डॉ. अभिजित जगताप, डॉ. श्रीराम राऊत, डॉ. अंजना लावंड आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com