प्रकाश : लोकमंगल परिवारातील एकनिष्ठ सारथी

लोकमंगल व सुभाष देशमुख यांच्याकडून कुटुंबीयांप्रमाणे वागणूक मिळाली
Prakash Bhonge
Prakash BhongeSaakal

सोलापूर - लोकमंगल परिवाराशी मागील पंचवीस वर्षे एकनिष्ठ राहिलेले प्रकाश भोंगे हे एकनिष्ठतेचे प्रतीक आहेत. प्रकाश भोंगे यांचे नाव महम्मद शहाबुद्दिन भोंगे असून ते मुस्लिम धर्मीय आहेत. मात्र ते सर्व लोकमंगल परिवारात ते 'प्रकाश मामा' या नावाने सुपरिचित आहेत. २३ मार्च १९९९ रोजी ते लोकमंगल परिवारात चालक म्हणून रुजू झाले. सुरूवातीपासूनच आमदार सुभाष देशमुख यांच्या गाडीचे चालक आहेत. ते रुजू झाले तेव्हा सुभाष देशमुख हे विधान परिषदेचे सदस्य होते. त्यानंतर खासदार, आमदार, मंत्री, पुन्हा आमदार असा सुभाष देशमुख यांचा राजकीय प्रवास राहिला. यासर्व काळात प्रकाश भोंगे हे चालक म्हणून कायम राहिले.

लोकमंगल परिवार व सुभाष देशमुख कुटुंबीय यांच्याकडून त्यांना मिळणारी वागणूक ही कधीही एक नोकर किंवा चालक या दृष्टीने नव्हती. त्यांना सदैव लोकमंगल आणि देशमुख परिवारातील एक कुटुंबीयच या नात्याने वागणूक मिळाली. यामुळे नोकरी बदलण्याचा कधीही विचार त्यांच्या मनाला शिवला नाही. चालक असणाऱ्या प्रकाश भोंगे यांना ड्रायव्हिंग बरोबरच फोटोग्राफीचा छंद आहे. लोकमंगल परिवारातील कार्यक्रमाची छायाचित्रे पत्रकारांना उपलब्ध करून देणे, ही भूमिकाही ते निभावतात. आमदार सुभाष देशमुख यांनी अनेक वाहने बदलली, मात्र चालक कधी बदलला नाही आणि प्रकाश यांनीही इतरत्र नोकरीचा कधीही विचार केला नाही.

तेच पद तीच कंपनी लोकमंगल परिवारात चालक म्हणून १९९८ मध्ये रुजू झालेल्या प्रकाश भोंगे यांना मार्च महिन्यांत चोवीस वर्षे पूर्ण झाली. सध्या पंचविसावे सुरू झाले. पुढील वर्षी त्यांच्या नोकरीचा रौप्य महोत्सव येईल. आज-काल सतत कंपनी, आणि पदे बदलली जातात. मात्र प्रकाश भोंगे यांनी एकाच पदावर एकाच कंपनीत पंचवीस वर्षे एकनिष्ठेने काम केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com