esakal | लय भारी! संख्याशास्त्राच्या स्पर्धेत पंढरपूरचा प्रशांत ननवरे भारतात दुसरा
sakal

बोलून बातमी शोधा

लय भारी! संख्याशास्त्राच्या स्पर्धेत पंढरपूरचा प्रशांत ननवरे भारतात दुसरा

फेब्रुवारी 2021मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील केवळ प्रशांतलाच हे पारितोषिक मिळाले आहे.

लय भारी! संख्याशास्त्राच्या स्पर्धेत पंढरपूरचा प्रशांत ननवरे भारतात दुसरा

sakal_logo
By
अभय जोशी - सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : भारत सरकारच्या सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वय मंत्रालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय संख्याशास्त्राच्या स्पर्धेत (In the Indian Statistics Competition) भंडीशेगाव (ता.पंढरपूर) मधील प्रशांत विजय ननवरेने (prashant nanaware) भारतामध्ये द्वितीय क्रमांक मिळविला आहे. (prashant nanaware from pandharpur has bagged the second position in the all India statistics competition in India)

हेही वाचा: पंढरपूर मंदिर परिसरातील पूजेचं साहित्य विक्रेते भाविकांच्या प्रतिक्षेत!

विशेष म्हणजे 2014 नंतर प्रथमच महाराष्ट्रातील विद्यार्थ्याने या देशपातळीवरील स्पर्धेत पारितोषिक मिळविल्याने सर्वत्र प्रशांतचे कौतुक होत आहे. प्रशांत ननवरे हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संख्याशास्र विभाग व प्रगत अध्ययन केंद्राचा विद्यार्थी आहे. या स्पर्धेत देशातील सर्व विद्यापीठांच्या संख्याशास्र विषयामध्ये पदवीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी सहभागी झाले होते. फेब्रुवारी 2021मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील केवळ प्रशांतलाच हे पारितोषिक मिळाले आहे. या स्पर्धेसाठी पुणे विद्यापीठाच्या संख्याशास्र विभागाच्या शिक्षिका डॉ. आकांक्षा काशीकर व इतर सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

हेही वाचा: आशादायक ! पंढरपूर तालुक्‍यातील 11 गावे झाली कोरोनामुक्त

अत्यंत गारीब परिस्थितीत शिक्षण घेत असलेल्या प्रशांतचे शालेय शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भंडीशेगाव, नवोद्यय विद्यालय पोखरापूर, फर्ग्युसन कॉलेज व पुणे विद्यापीठ येथे झाले आहे. (prashant nanaware from pandharpur has bagged the second position in the all India statistics competition in India)