esakal | Solapur: शहरातील 156 शाळांची वाजणार घंटा! विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी सज्ज
sakal

बोलून बातमी शोधा

school_bell

शासनाने शिक्षकांच्या लसीकरणावर अधिक भर दिला असून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा अहवाल मागविला आहे.

शहरातील 156 शाळांची वाजणार घंटा! विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी सज्ज

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

सोलापूर: सोमवारपासून आठवी ते बारावी वर्ग सुरू होणार असल्याने शहरातील 156 शाळांची पूर्वतयारी सुरू आहे. तर 55 हजार विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. शासनाने शिक्षकांच्या लसीकरणावर अधिक भर दिला असून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा अहवाल मागविला आहे.

शहरात तब्बल दहा महिन्यानंतर शाळा सुरू होत आहे. यापूर्वी पाचवी ते बारावी वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. परंतु प्रत्यक्षात शाळा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याच नाहीत. जानेवारी महिन्यात काही शाळा एक-दोन महिने व्यवस्थित सुरू राहिल्या. त्यानंतर त्या पूर्णत: बंद झाल्या. आता सोमवारपासून (ता.4) आठवी ते बारावी वर्ग सुरू करण्यात येत आहेत. त्याच पार्श्‍वभूमीवर स्वच्छता, सॅनिटायझर, सोशल डिस्टनद्वारे आसन व्यवस्था, शिक्षकांचे लसीकरण आदी शाळांची पूर्वतयारी वेगाने सुरू आहे. शाळा व्यवस्थापनाकडून झालेल्या पूर्वतयारी पाहणीसाठी 130 शाळांना महापालिका शिक्षण विभागाने भेटी देऊन पाहणी केली. शासनाने शिक्षकांच्या लसीकरणावर अधिक भर दिला असून त्याची संपूर्ण जबाबदारी शाळा व्यवस्थापनावर सोपविली आहे. लसीकरण न झालेल्या शिक्षकांची यादी देण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले आहेत.

हेही वाचा: दीड हजार स्मार्ट पोलखालीच अंधार! एलईडीचा नुसताच बोलबाला

आठवी ते बारावी शाळांची संख्या - 156

एकूण विद्यार्थी संख्या - 55 हजार

एकूण शिक्षकांची संख्या - 2 हजार 998

दोन डोस पूर्ण झालेल्या शिक्षकांची संख्या - 1 हजार 201

पहिला डोस घेतलेले - 1 हजार 327

लस न घेतलेले शिक्षक - 235

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळा पूर्वतयारी अंतर्गत 130 शाळांना भेटी देण्यात आल्या आहेत. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे 100 टक्‍के लसीकरण पूर्ण करण्याबाबतच्या सूचनाही दिल्या आहेत.

- कादर शेख, प्रशासनाधिकारी, महापालिका.

बातमीदार: प्रमिला चोरगी

loading image
go to top