नगरसेवकांनी सुचविलेल्या नव्हे उपयुक्त कामांना प्राधान्य

आयुक्त; आजपासून नव्या अंदाजपत्रकाची अंमलबजावणी
Solapur Municipal Corporation
Solapur Municipal Corporation sakal

सोलापूर : सन २०२२-२३ च्या नव्या अंदाजपत्रकाच्या अंमलबजावणीला १ एप्रिलपासून सुरवात करण्यात येणार आहे. मात्र नगरसेवकांनी भांडवली निधीतून सुचविण्यात आलेली २५ कोटींची कामे करण्यात येणार नसून, शहरासाठी उपयुक्त असलेल्या रस्ते विकासाला प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली. महापालिकेच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी मुदत संपण्यापूर्वीच घाईगडबडीत २०२२-२३ चे अंदाजपत्रक सादर केले. प्रशासनाच्या अंदाजपत्रकामध्ये भांडवली कामांसाठी निधीची तरतूद नव्हती.

परंतु, पदाधिकाऱ्यांनी २५ कोटी रुपयांची तरतूद करून घेतली. या तरतुदीनुसार नगरसेवकांनी नवीन प्रभाग रचनेनुसार कामांची यादी अंदाजपत्रकाला जोडली. सध्या सभागृह अस्तित्वात नसले तरी नगरसेवकांनी सुचविलेल्या भांडवली कामांची अंमलबजावणी प्रशासन करू शकते. २०२२-२३ या आर्थिक वर्षातील अंदाजपत्रकाच्या अंमलबजावणीला १ एप्रिलपासून सुरवात करण्यात येणार आहे. मात्र महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने भांडवली कामांसाठी पैसे नाहीत. त्यामुळे तूर्तास तरी नगरसेवकांनी सुचविलेली कामे करण्यात येणार नाहीत. शहरासाठी आवश्यक असलेल्या रस्ते कामांना प्राधान्य देण्यात येत असून, नगरसेवकांनी सुचविलेल्या कामांमध्ये शहरातील महत्त्वपूर्ण सुविधांचा समावेश असल्यास नक्कीच ती कामे करण्यात येतील, असेही आयुक्तांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com