Pune : कर्जातील कारखाना चांगला चालवून दाखवू शिवानंद पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंगळवेढा

Solapur : "कर्जातील कारखाना चांगला चालवून दाखवू" - शिवानंद पाटील

मंगळवेढा : तालुक्यातील जेष्ठ मंडळींनी आणि सभासदांनी कारखान्याची जबाबदारी आमचेवर दिली पण मागील संचालक मंडळाने केलेली देणी फेडण्याचे काम आमच्या संचालक मंडळावर आले.तरीहीप्रशांतराव परिचारक, भगिरथ भालके यांचे मार्गदर्शन, मार्गदर्शक प्रा शिवाजीराव काळुंगे, रामकृष्ण नागणे, राहूल शहा, दामोदर देशमुख यांनी बँकेच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य केल्याने आपण हा गळीत हंगाम चालू करु शकलो असे प्रतिपादन दामाजीचे अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी व्यक्त केले.

श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचा यंदाचा ३० वा गळीत हंगाम ह भ प गोपाळ आण्णा तुकाराम वासकर महाराज, रमेश मर्दा, मनोहर कलुबर्मे,जगन्नाथ कोकरे, दादा बंडगर, भिमराव मोरे, कृष्णदेव मासाळ  यांचे शुभहस्ते धनश्री परिवाराचे प्रा शिवाजीराव काळुंगे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

यावेळी उपाध्यक्ष तानाजी खरात,ॲड नंदकुमार पवार, राहूल शहा, दामोदर देशमुख, रामकृष्ण नागणे, रामचंद्र वाकडे, यादाप्पा माळी प्रकाश गायकवाड,अजित जगताप, भारत पाटील, प्रशांत यादव, चंद्रशेखर कौडूभैरी, अरुण किल्लेदार, यांचेसह मुझफर काझी, नंदकुमार हावनाळे सह सर्व संचालक,सभासद, तोडणी वाहतुक ठेकेदार, कंत्राटदार, कारखान्याचे खातेप्रमुख,कर्मचारी उपस्थित होते.तत्पूर्वी  संचालक गोपाळ भगरे व त्यांच्या पत्नी रिना भगरे या उभयतांचे हस्ते श्री सत्यनारायण महापूज करण्यात आली.

यावेळी बोलताना अध्यक्ष पाटील म्हणाले की,प्रति दिवस साडेचार ते पांच हजार मे टन गाळप होईल अशा प्रकारे नियोजन करुन यंत्रणा भरलेली आहे  या संचालक मंडळाने स्वताच्या मालमत्तेवर कर्जे काढून निधी उपलब्ध केला आहे   शेतक-यांची मागील संचालक मंडळाचे काळातील 2100 प्रमाणे राहिलेली बिले अदा केली.  एफ आर पी  पूर्ण करण्यासाठी राहिलेले 111 रू चे बिल दोन ते तीन दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या धनश्री पतसंस्थेतील बँक खात्यावर वर्ग करणार आहोत सभासद व कामगार हे संस्थेच्या दृष्टीने महत्वाचे घटक आहेत.

आर्थिक अडचण असतानासुध्द्ा कामगारांचे योगदान विचारात घेवुन दिवाळीसाठी दहा दिवसाच्या पगाराएवढा बोनस देण्यात येणार आहे तर प्रास्तावित डिस्टीलरी प्रकल्पाची सुनावणी उद्या होणार आहे.अध्यक्षपदावरून बोलताना प्रा शिवाजीराव काळुंगे मार्गदर्शन करताना म्हणाले, स्पर्धेत टिकुन राहणेसाठी कारखान्याला डिस्टीलरी व इथेनाॅलशिवाय पर्याय उरला नाही   त्यामुळे या संचालक मंडळाने यासाठी तत्परतेने प्रयत्न करणे गरजेचे आहे  सध्याची कारखान्याची आर्थिक परिस्थिती पहाता या संचालक मंडळाने काटकसरीने कारभार केला पाहिजे.

ह भ प  गोपाळ आण्णा वासकर की म्हणाले, दुख सहन करण्याची क्षमता फक्त शेतक-यांमध्येच  आहे   शेतकरी हा मालाच्या भावाविषयी कधी तक्रार करीत नाही, जो भाव मिळेल तो स्विकारतो  शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. कारखानदारांनी शेतक-यांना समाधानकारक भाव दिला तर शेतकरी समाधानी रहाणार आहे.कार्यकारी संचालक सुनिल दळवी यांनी प्रास्ताविक केले.यावेळी राहूल शहा,मनोहर कलुबर्मे,लतिफ तांबोळी, किशोर मर्दा, देवानंद गुंड-पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.सुत्रसंचालन अशोक उन्हाळे यांनी तर आभार संचालक दिगंबर भाकरे यांनी मानले