सोलापूर : इंधन दरवाढीनंतरही २३ हजार दुचाकींची खरेदी

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असण्याचा परिणाम; जिल्ह्यात एकूण ११ लाख वाहने
Two Wheelers
Two Wheelers sakal

सोलापूर : जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलची दरवाढ मागील आठ ते नऊ महिन्यांपासून सातत्याने होत आहे. त्यात पेट्रोलचे दर ११३ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. वाढत्या इंधन दरवाढीच्या काळातही जिल्ह्यात जवळपास २३ हजार ६०५ दुचाकींची तर चारचाकी वाहनांची ३ हजार १५२ व अन्य वाहनांची खरेदी झाली आहे. या माध्यमातून सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळाला आहे.(Purchase of 23000 two wheelers even after fuel price increased)

Two Wheelers
पुणे : चंदन तस्करी प्रकरणात एकास पकडले

कोरोनाकाळात लॉकडाउनमुळे तसेच सार्वजनिक प्रवासी वाहतुकीच्या सेवेवर निर्बंध घातल्याने सर्वसामान्यांना मोठी गैरसोय निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेता अनेकांकडून दुचाकी तसेच चारचाकी वाहने खरेदी करण्यास प्राधान्य देण्यात आले. ता. १ एप्रिल ते ३१ डिसेंबर या नऊ महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यात २३ हजार ६०५ दुचाकी वाहनांची खरेदी झाली आहे तर तीन हजार १५२ चारचाकी वाहनांची नागरिकांनी खरेदी केली आहे. यासह अन्य वाहन प्रकारांना ही प्राधान्य देण्यात आले आहे. जिल्ह्यात नऊ महिन्यात दुचाकी आणि चारचाकी मिळून एकूण २६ हजार ७५७ वाहनांची खरेदी झाली असल्याची माहिती, यावेळी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून देण्यात आली.(Solapur news)

Two Wheelers
शेतकऱ्यांच्या खात्यात 'एफआरपी' चे 8299 कोटी जमा

तीन हजार ट्रॅक्‍टरची खरेदी

शेती कामासाठी आता ट्रॅक्‍टर-ट्रॉली यासह अन्य वाहनांचा वापर केला जात आहे. पेरणी, मशागत व इतर कामासांठी ट्रॅक्‍टरच्या सहाय्याने झटपट कामे व्हावीत, याकरिता शोतकरी ट्रॅक्‍टर खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. मागील नऊ महिन्यांत तीन हजार ८९० ट्रॅक्‍टरची खरेदी करण्यात आली आहे तर ८१८ ट्रॉलीची खरेदी करण्यात आली आहे.

ठळक बाबी...

  • चारचाकी वाहनांना वाढली मागणी

  • मागणी वाढल्याने चारचाकी वाहनांसाठी तीन महिन्यांची पाहावे लागते वाट

  • पेट्रोल-डिझेल दरवाढीचा दिसून येईना परिणाम

  • नागरिकांकडून सुरक्षेला दिले जाते महत्व

Two Wheelers
महापुरुषांच्या पुतळे निर्मितीचे बेळगाव बनतंय ‘हब’

ऑटो रिक्षाने मिळतोय रोजगार ७४ रिक्षांची खरेदी

सार्वजनिक वाहतुकीसाठी रिक्षा हे महत्त्वाचे साधन आहे. रिक्षा खरेदीची संख्या यामुळे वाढली. बेरोजगार असलेल्या अनेकांना रिक्षाच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक करून रोजगार उपलब्ध होत आहे. त्यामुळे रिक्षांच्या खरेदीला देखील प्राधान्य दिले जात असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

कोरोनामध्ये लॉकडाउन करण्यात आल्याने प्रवासी वाहतुकीचे साधने बंद असल्याने नागरिकांनी मागील वर्षभरात दुचाकी आणि चारचाकी बरोबरच इतर वाहन खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. आगामी काळात यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे.

- विजय तिराणकर, सहाय्यक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com