esakal | वादळामुळे द्राक्षबाग जमीनदोस्त शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी
sakal

बोलून बातमी शोधा

grapas.jpg

अगदी हातातोंडाशी आलेला घास या आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडातून हिरावून घेतला गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले. आपल्या खडकाळ जमिनीत पहिल्यांदाच एक एकरवर द्राक्षबाग लावली.

वादळामुळे द्राक्षबाग जमीनदोस्त शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

केम (सोलापूर) : एकीकडे "कोरोना'च्या संकटामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल अगदी कवडीमोल दराने व्यापारी खरेदी करत आहेत. तर, दुसरीकडे काल केम परिसरात झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळे शेतकरी ज्ञानेश्‍वर भानुदास देवकर यांची एक एकर द्राक्षबाग जमीनदोस्त होऊन जवळपास चार लाखांचे नुकसान झाले आहे. अगदी हातातोंडाशी आलेला घास या आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडातून हिरावून घेतला गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले. आपल्या खडकाळ जमिनीत पहिल्यांदाच एक एकरवर द्राक्षबाग लावली. जमिनीची मशागत, रोपे, फाउंडेशन, खते तसेच वेळोवेळी औषधे फवारणी, मजूर खर्च यांचा मिळून जवळपास तीन लाखांपर्यंत खर्च झाला. अतिशय कष्टातून, जिद्दीने त्यांनी या बागेला सांभाळले. पाणी कमी असताना ठिबक सिंचनचा वापर करून बाग जगवली. परंतु, निसर्गाच्या या आपत्तीपुढे या शेतकऱ्याला हतबल होण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. या भागात इतरही शेतकऱ्यांचे काही प्रमाणात डाळिंबाचेही नुकसान झाले आहे. या वादळी वाऱ्यामुळे झालेल्या शेतमालाची नुकसानभरपाई शासनाकडून मिळावी, अशी मागणी येथील शेतकऱ्यांकडून होत आहे. 
 

loading image