जिल्हा परिषद सीईओना न भेटताच डिसले गुरुजी अमेरिकेला रवाना!

ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले हे फुलब्राईट शिष्यवृत्तीसाठी मंगळवारी (ता. ९) पहाटे मुंबई विमानतळावरून अमेरिकेला रवाना झाले.
Ranjitsinh Disale guruji
Ranjitsinh Disale gurujisakal
Summary

ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले हे फुलब्राईट शिष्यवृत्तीसाठी मंगळवारी (ता. ९) पहाटे मुंबई विमानतळावरून अमेरिकेला रवाना झाले.

सोलापूर - ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले हे फुलब्राईट शिष्यवृत्तीसाठी मंगळवारी (ता. ९) पहाटे मुंबई विमानतळावरून अमेरिकेला रवाना झाले. सहा महिने त्याठिकाणी राहून ते शिक्षणावर संशोधन करणार आहेत. जाण्यापूर्वी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आवर्जुन भेट घेतली. पण, जिल्हा प्रशासनातील कोणत्याही अधिकाऱ्यांना ते ना भेटले ना त्यासंदर्भात सांगितले, हे विशेष.

ग्लोबल टिचर अवार्ड मिळाल्यानंतर त्यांना अमेरिकेने फुलब्राईटसाठी निमंत्रित केले. २०२१ मध्ये जगातील ४० शिक्षकांना ही शिष्यवृत्ती जाहीर केली होती. त्यात रणजितसिंह डिसलेंचा समावेश होता. ‘लेट्‌स क्रॉस द बॉर्डर’ या उपक्रमातून ते जगभरातील अशांत देशातील मुलांना एकत्र आणून त्यांच्यात अहिंसेच्या विचारांचा प्रसार करण्याचे काम पीस इन एज्युकेशन विषयावर संशोधन केले जाते. डिसले गुरुजींनी ग्लोबल पुरस्कार मिळण्यापूर्वी डिसले गुरुजींनी झेडपी शाळांना क्युआर कोड शिक्षण प्रणाली दिली. २००९ मध्ये जिल्हा परिषदेत उपशिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांच्या तंत्रज्ञानाचा उपयोग इतर शिक्षकांनाही व्हावा म्हणून डिसलेंना २०१७ मध्ये वेळापूर येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण केंद्रात (डायट) प्रतिनियुक्ती दिली. सलग तीन वर्षे त्याठिकाणी ते प्रतिनियुक्तीवर असतानाही ते केवळ एक दिवसच त्याठिकाणी गेल्याची बाब समोर आली. त्यामुळे त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. आता सहा महिने ते अमेरिकेत राहणार आहेत. तोवर जिल्हा प्रशासनाकडून त्यांच्या संदर्भातील सर्वच बाबींची सखोल चौकशी केली जाणार आहे.

‘ग्लोबल’ची सुक्ष्म पडताळणी

‘डायट’कडे ३२ महिने प्रतिनियुक्तीवर असताना परितेवाडी (ता. माढा) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेवरील उपशिक्षक रणजितसिंह डिसले हे त्याठिकाणी केवळ एक दिवसच उपस्थित राहीले. त्याबाबतीत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून दोनदा चौकशी झाली. त्यातही त्यांची गैरहजेरी समोर आली. तरीपण, त्यांनी जवळपास साडेचारशे पानांचा खुलासा दिला आहे. त्यातील प्रत्येक बाबींची सखोल चौकशी होणार असून त्यांनी दिलेल्या माहितीद्वारे प्रत्येक संस्थेत जाऊन डिसलेंची चौकशी केली जाणार आहे.

पगार देणाऱ्यांवरही होणार कारवाई?

प्रतिनियुक्तीवर असतानाही रणजितसिंह डिसले हे ३२ महिने ‘डायट’कडे गेले नाहीत. तरीपण, त्यासंदर्भात वेळोवेळी जिल्हा परिषदेला रिपोर्टिंग का झाले नाही, त्यांनी ३२ महिने पगार उचलला तरीपण त्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाला संबंधित शाळा व अधिकाऱ्यांनी का दिली नाही, त्याचीदेखील सखोल चौकशी होईल, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले. डिसले जे शिक्षण विभागात कायम असल्याने त्यांच्यावर कारवाई निश्चित होईल, पण त्यांना पाठिशी घालणारे कोण, याचाही शोध घेतला जात असल्याचेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com