esakal | पांडुरंग, राही आणि रखुमाईच्या मूर्तींची ट्रॅक्‍टरमधून रथयात्रा !
sakal

बोलून बातमी शोधा

पांडुरंग, राही आणि रखुमाईच्या मूर्तींची ट्रॅक्‍टरमधून रथयात्रा !

पांडुरंग, राही आणि रखुमाईच्या मूर्तींची ट्रॅक्‍टरमधून रथयात्रा!

sakal_logo
By
अभय जोशी - सकाळ वृत्तसेवा

एकादशीच्या निमित्ताने भव्य रथयात्रा निघत असते; परंतु यंदा देखील मानकरी मंडळींना श्री पांडुरंग, श्री राही आणि श्री रखुमाईच्या मूर्तींची ट्रॅक्‍टरमधून रथयात्रा काढावी लागली.

पंढरपूर (सोलापूर) : आषाढी यात्रेत (Ashadhi Ekadashi) लाखोंच्या संख्येने येणाऱ्या वारकऱ्यांना गर्दीमुळे श्री विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घेता येत नाही. अशा वारकऱ्यांना विठुरायाचे दर्शन घडावे यासाठी दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) दिवशी श्री विठ्ठलाची रथयात्रा काढण्याची परंपरा आहे. त्यासाठी भव्य लाकडी रथ आहे. या रथयात्रेचे मानकरी देखील ठरले आहेत. आषाढी आणि कार्तिकी यात्रेच्या सोहळ्यातील रथयात्रेला वारकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्व आहे. मात्र कोरोनाच्या (Covid-19) सावटामुळे सलग दुसऱ्या वर्षी आषाढी एकादशी वारकरी भक्तांच्या विना साजरी झाली. एकादशीच्या निमित्ताने भव्य रथयात्रा निघत असते; परंतु यंदा देखील मानकरी मंडळींना श्री पांडुरंग, श्री राही आणि श्री रखुमाईच्या मूर्तींची ट्रॅक्‍टरमधून रथयात्रा काढावी लागली. (Rathyatra of Shri Vitthal taken out from a tractor on the occasion of Ashadhi Ekadashi-ssd73)

हेही वाचा: अन्‌ मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीतून जखमींना पाठविले रुग्णालयात

कोरोनाच्या सावटामुळे यात्रा जशी प्रतिकात्मक होत आहे, तशीच रथयात्रा देखील प्रतिकात्मक स्वरूपात काढली जात आहे. माहेश्वरी धर्मशाळेपासून दुपारी बाराच्या सुमारास ट्रॅक्‍टरमधून रथयात्रा काढण्यात आली. प्रथेप्रमाणे नगरप्रदक्षिणा करून पुन्हा माहेश्वरी धर्मशाळेजवळ या रथयात्रेची सांगता करण्यात आली. आषाढी यात्रेसाठी दरवर्षी सुमारे दहा लाखाहून अधिक वारकऱ्यांची गर्दी होत असते. यात्रेसाठी मोठ्या संख्येने वारकरी आल्यास कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्‍यता आहे, हे लक्षात घेऊन शासनाने सलग दुसऱ्या वर्षी आषाढी यात्रा प्रतिकात्मक साजरी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी वारकरी भक्तांच्या विना आषाढीचा सोहळा साजरा झाला.

हेही वाचा: आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी संतांच्या पादुकांचे झाले चंद्रभागा स्नान!

ऐन यात्राकाळात पंढरपूर शहर आणि लगतच्या दहा गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरवर्षी आषाढी एकादशी दिवशी चंद्रभागेच्या काठावर लाखो वारकरी स्नानाची पर्वणी साधण्यासाठी दाटी करतात, ते चंद्रभागेचे वाळवंट देखील आज भाविकांच्या विना सुनेसुने दिसत होते.

loading image