रयत क्रांती संघटनेचा तारापूर येथे रास्तारोको | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीज पुरवठा

पंढरपूर : रयत क्रांती संघटनेचा तारापूर येथे रास्तारोको

पंढरपूर : थकीत वीज बिल वसुलीसाठी खंडित करण्यात आलेला शेतीपंपाचा वीज पुरवठा सुरु करावा, अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, या प्रमुख मागण्यांसाठी शुक्रवारी (ता.२४) रयत क्रांती संघटनेच्या वतीने तारापूर नाला (ता.पंढरपूर) येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

वीज बिल वसुलीसाठी महावितरण कंपनीने पंढरपूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या शेती पंपाचा वीज पुरवठा बंद केला आहे. वीज पुरवठा बंद असल्याने ऊस, मका, ज्वारीसह डाळिंब व द्राक्ष पिकांचे नुकसान झाले आहे. वीज पुरवठा सुरळीत करावा, या मागणीसाठी पंढरपूर-तिर्हे मार्गावरील तारापूर नाला येथे रयत क्रांती संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष दीपक भोसले यांच्या नेतृत्वाखाली या भागातील शेतकरी व कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे दोन तासाहून अधिक वेळ आंदोलन सुरु राहिल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

हेही वाचा: सोलापूर जिल्ह्यात आढळले आठ नवे रुग्ण

दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रंगा लागल्या होत्या. यावेळी शेतकऱ्यांनी महावितरण कंपनी व सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना वीज प्रश्नावरुन चांगलेच धारेवर धरले. महावितरण कंपनीने अन्यायकारक पध्दतीने सुरु केलेली वीज बिल वसुली त्वरीत थांबवून शेतीपंपाचा वीज पुरवठा तातडीने सुरु करावा,अन्यथा वीज वितरण कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा रयत क्रांती संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष दीपक भोसले यांनी दिला. रास्तारोको आंदोलनामध्ये छगन पवार, लक्ष्मण काळे, बाळासाहेब बोबडे, दिगंबर ननवरे,धनाजी चव्हाण, संतोष शेळके, सागर निर्मळ, प्रदीप कदम, विक्रम शेळके, विठ्ठल माने, सिद्राम वाघमोडे, बापू बोबडे, पोपट कोळी यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Web Title: Rayat Kranti Sanghatana Tarapur At Rastaroko

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Solapur