लोकसभा जिंकण्यासाठी 'या' बड्या नेत्याकडं काँग्रेसनं दिली मोठी जबाबदारी; बैठकीत एकमतानं ठराव I Solapur Politics | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

LokSabha Election Congress Sushilkumar Shinde

ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहर- जिल्ह्याची संघटना खंबीरपणे काम करत आहे.

Solapur Politics : लोकसभा जिंकण्यासाठी 'या' बड्या नेत्याकडं काँग्रेसनं दिली मोठी जबाबदारी; बैठकीत एकमतानं ठराव

सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणूक- २०२४ चे सर्व अधिकार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांना देण्याचा ठराव एकमताने शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी मांडला. जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांनी त्या ठरावाला अनुमोदन दिले.

सोलापूर लोकसभा मतदारसंघाची (Solapur LokSabha Election) आढावा बैठक शनिवारी (ता. ३) मुंबईतील टिळक भवनात पार पडली. यावेळी काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे, आशीष दुआ, सोनल पटेल, नसीम खान, कुणाल पाटील, मोहन जोशी, उल्हास पवार आदी वरिष्ठ नेतेमंडळी उपस्थित होते.

यावेळी आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहर- जिल्ह्याची संघटना खंबीरपणे काम करत आहे. त्यांच्याकडे सोलापूर लोकसभेचे सर्वाधिकार देण्याचा ठराव सर्व पदाधिकाऱ्यांनी एकदिलाने मांडल्याचा आनंद आहे. पण, काहीतरी नवीन कांड करून निवडणूक जिंकण्याची भाजपची पद्धत आहे. आपण सर्वजण अतिआत्मविश्वासात न राहता काँग्रेसचे खासदार निवडून यावेत, यासाठी एकजुटीने प्रयत्न करूयात.

या बैठकीसाठी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, ज्येष्ठ नेते धनाजी साठे, रामहरी रूपनवर, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, रियाज हुंडेकरी, विनोद भोसले, महिला जिल्हाध्यक्षा शाहीन शेख, प्रदेश चिटणीस किसन मेकाले, नरसिंह आसादे, पंडित सातपुते, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, अंबादास करगुळे, देविदास गायकवाड, उदय चाकोते, बाबूराव म्हेत्रे, अरुण साठे, लक्ष्मीकांत साका, सुशील बंदपट्टे, रफीक इनामदार, वाहिद विजापुरे.

तसेच तिरुपती परकीपंडला, दादा साठे, रूपेश गायकवाड, प्रतीक आबुटे, विश्वराज चाकोते, श्रद्धा हुल्लेनवरु आबूटे, भीमराव बाळगी, सुधीर लांडे, रमेश हसापुरे, महेश जोकारे, वसीम पठाण, राजन कामत, पशुपती माशाळ, श्रीकांत वाडेकर, शुभम माने, मोतीराम चव्हाण, ऋषिकेश बोबडे, नाना पालकर, अण्णा शिंदे, किशोर पवार, समीर शेख, अदनान शेख, सुभाष वाघमारे, महेंद्र शिंदे, राजकुमार पवार, पीयूष इंगळे आदी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या बैठका सुरु झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचाच

प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले, काँग्रेसला सध्या वातावरण चांगले आहे, म्हणून कोणीही गाफिल राहू नये. लवकरच लोकसभा निवडणूक लागणार असून त्याच्या तयारीला लागा. महाराष्ट्रातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात सर्व समाजाला सोबत घेऊन जनतेची कामे करा. संघटना मजबूत असल्यास आपल्याला कोणीही हरवू शकणार नाही. सोलापूर लोकसभा मतदारसंघ कोणाला सोडण्याचा प्रश्न येतच नाही. सोलापूर लोकसभेची जागा ही काँग्रेसच्याच वाट्याची आहे. तुमच्या भावना राष्ट्रीय नेत्यांकडे पोचविण्यात आल्या आहेत.