बोगस ठिबक संच कर्ज प्रकरण : गैरव्यवहाराची व्याप्ती वाढण्याची शक्‍यता

बॅंके ऑफ महाराष्ट्रच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचाही सहभाग असल्याची तक्रार
retired employee of Bank of Maharashtra Bogus irrigation loan case solapur Pandharpur
retired employee of Bank of Maharashtra Bogus irrigation loan case solapur Pandharpursakal

पंढरपूर : पंढरपूर आणि माळशिरस तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या बोगस ठिबस संच खरेदी प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्‍यता आहे. श्रीपूर (ता. माळशिरस) येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या तत्कालीन शाखा अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर आता बॅंकेच्या एका सेवानिवृत्त शिपायाचाही यामध्ये सहभाग असल्याचे समोर आले आहे. येथील शेतकऱ्यांनी एका सेवानिवृत्त शिपायाच्या विरोधात ही पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानंतर बॅंकेने आणि पोलिसांनी याप्रकरणी चौकशी सुरु केली आहे. (Bogus Irrigation Loan Case)

ठिबक संच विक्रेत्याबरोबर संगनमत करुन बॅंकेच्या तत्कालीन शाखा अधिकाऱ्याने पंढरपूर व माळशिरस तालुक्‍यातील अनेक शेतकऱ्यांच्या नावे ठिबक संच खरेदीची बोगस कर्ज प्रकरणे करुन कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार केला आहे. याप्रकरणी संबंधित बॅंक अधिकाऱ्यावर व माजी सेवानिवृत्त शिपाई हणमंत खरात यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी लेखी तक्रार रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष राहुल बिडवे यांनी अकलूजचे उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे केली आहे.

माळशिरस तालुक्‍यातील श्रीपूर येथे बॅंक ऑफ महाराष्ट्रची शाखा आहे. २०१४ ते २०१७ दरम्यानच्या तत्कालीन शाखा अधिकारी जाफर अहमद सय्यद यांनी बॅंकेचे सेवा निवृत्त शिपाई हनुमंत खरात यांच्या मदतीने पंढरपूर तालुक्‍यातील नांदोरे, नेमतवाडी, पेहे, माळशिरस तालुक्‍यातील जांबूड, पेहे,

नेवरे यासह इतर अनेक गावातील शेतकऱ्यांच्या नावे ठिबस संच खरेदीची बोगस कर्ज प्रकरणे करुन जवळपास अडीच ते तीन कोटी रुपयांचा गुंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तब्बल पाच वर्षानंतर बॅंकेने थकीत कर्जाची रक्कम वसुलीसाठी शेतकऱ्यांना नोटीस पाठवल्यानंतर घोटाळ्याचा प्रकार उघड झाला आहे. नांदोरे (ता. पंढरपूर) येथील रामचंद्र वाघ, हरी वाघ, उषा वाघ, प्रभू वाघ तर नेमतवाडी (ता. पंढरपूर) येथील धुळा वाघमोडे, तुकाराम चव्हाण, प्रल्हाद चव्हाण यांच्यासह जांबूड, तोंडले (ता. माळशिरस) येथील त्र्यंबक भुसनर, मंगल भुसनर, साळुबाई खाडमोडे, श्री. चव्हाण यासह इतर अनेक शेतकऱ्यांच्या नावे ठिकब संच खरेदीसह लाखो रुपयांची बोगस पीक कर्जे काढली आहेत. यामध्ये तत्कालीन शाखा अधिकारी जफर अहमद सय्यद यांच्यासह तत्कालीन बॅंकेचे शिपाई हनुमंत खरात (रा. जांबुड, ता. माळशिरस) यांच्यावर पोलिसांनी कारवाई करुन त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे राहुल बिडवे व राष्ट्रवादीचे सुमित भोसले यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com