इंदापूर : लोणी देवकर येथे झालेल्या जबरी चोरीतील दोन आरोपींना अटक

चार अज्ञात गुन्हेगारांनी चाकूचा धाक दाखवत १ लाख ५१ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज लंपास
robbery at Loni Deokar arrested two accused
robbery at Loni Deokar arrested two accused sakal

इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथील डोंगरे वस्ती येथे सोमवार दि. ४ एप्रिल २०२२ रोजी रात्री ८ वाजता चार अज्ञात गुन्हेगारांनी चाकूचा धाक दाखवत १ लाख ५१ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी आनंद सहदेव डोंगरे ( वय ३५, रा. डोंगरेवस्ती लोणी देवकर ता. इंदापूर जि पुणे ) यांच्या फिर्यादीवरुन इंदापूर पोलीसांनी केवळ चार तासात गुन्ह्याचा छडा लावत दोनआरोपींना अटक केली तर दोन आरोपी फरारआहेत. अटक गुन्हेगाराकडून इंदापूर पोलीसांनी तीन मोबाईल, गुन्ह्यात वापरलेली स्काॅर्पिओ व हत्यारे जप्त केली असून अटकगुन्हेगारांपैकी एक अट्टल गुन्हेगार आहे.त्याच्यावरकरमाळा पोलीस ठाण्यात विविध ३ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली.

गुन्ह्यातील चार आरोपींनी फिर्यादी डोंगरे यांच्या घरी जावून चाकूचा धाक दाखवत फिर्यादी सह फिर्यादीच्या आईला मारहाण करुन शिवीगाळ केली. हातातील चाकूने धमकी देवून रोख रक्कम सोन्याचे दागीने व मोबाइल असा एकूण १ लाख ५१हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला.याचोरीत २० हजार रुपये किमतीचे साडे चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे मनी मंगळसुत्र,१४ हजार रुपये किमतीचे साडेतीन ग्रॅमवजनाचेसोन्याचे मनी मंगळसुत्र, ८ हजार रुपये किमतीचे अडीच ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातीलरिंगा व कानातील काडी, ७० हजार रुपये किमतीचे वीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे मनी मंगळसुत्र, २३ हजार रुपये किमतीची साडे पाच ग्रॅम वजनाची कानातील फुले,५०० रूपये रोख रक्कम,५ हजार रुपयेकिमतीचा एक व्हिओ, ओपो व एम आय कंपनीचा मोबाइल, १ हजार रुपये किमतीचानोकिया कंपनीचा मोबाइल असा ऐवज लंपास केला होता. सदरील घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक टी. वाय मुजावर यांनी पोलीस यंत्रणा सतर्क करुन आरोपींचा शोध सुरू केला.सरडेवाडीटोलनाक्यावरसीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर चोरट्यांच्या गाडीची माहिती मिळाली. त्यानंतर पाठलाग करून पोलीसांनी करमाळा तालुक्यातील खांबेवस्ती येथे दोन दरोडेखोरांसह पांढऱ्या रंगाचीएम. एच १३ एसी ०२९६ ही गाडी जप्तकेली.

सदर कारवाई पुणे ग्रामीणचेपोलीसअधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शना खाली तसेच पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांच्या नेतृत्वाखालीसहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे व महेश माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील ,पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाडुळे,जगदीश चौधर,बापू मोहिते,मोहम्मद अली मड्डी, सलमान खान,विकास राखुंडे,विशाल चौधर या पथकाने केली.

चौकट - या गुन्ह्याचा केवळ चार तासात छडा लावल्या बद्दल इंदापूरपोलीसठाण्याच्या महिला पोलीस हवालदार माधुरी लडकत व शुभांगी खंडागळे यांनी पोलीस निरीक्षकटी. वाय.मुजावर व पोलीस पथकाचे औक्षण करुन स्वागत केले तर पोलीस उपनिरीक्षक दाजी देठे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी फटाखेबाजी करण्यातआल्याने परिसरातील नागरिकांनी पोलीस ठाण्यात धाव घेवून पोलिसांचे अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com