esakal | गर्भवतींनो, काळजी घेतल्यास कोरोनाचा त्रास नाहीच - डॉ. साडेकर
sakal

बोलून बातमी शोधा

Safe Motherhood Day

गर्भवतींनो, काळजी घेतल्यास कोरोनाचा त्रास नाहीच - डॉ. साडेकर

sakal_logo
By
प्रशांत काळे

कोरोना संसर्गाच्या दोन लाटांमध्ये गर्भवती महिलांनी स्वतःची काळजी योग्यरीतीने घेतल्याने संसर्गापासून दूर राहिल्या. तर ज्यांना कोरोनाचा संसर्ग झाला त्याचा परिणाम बाळावर झाला नाही.

बार्शी (सोलापूर) : कोरोना (Covid-19) संसर्गाच्या दोन लाटांमध्ये गर्भवती महिलांनी (Pregnant women) स्वतःची काळजी योग्यरीतीने घेतल्याने संसर्गापासून दूर राहिल्या. तर ज्यांना कोरोनाचा संसर्ग झाला त्याचा परिणाम बाळावर झाला नाही. 90 टक्के गर्भवती कोरोनापासून दूर होत्या. 5 टक्केमध्ये थोडा प्रादुर्भाव आढळला तर 2 ते 3 टक्के महिलांना कोरोना होऊन गेला पण व्यवस्थित उपचाराने बऱ्या झाल्या. सुरक्षित होत्या, अशी माहिती जगदाळे मामा रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. शिवाजी साडेकर (Gynecologist Dr. Shivaji Sadekar) यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. (Safe Motherhood Day : Corona will not be bothered if pregnant women take care of it)

हेही वाचा: आधुनिक वैद्यक संशोधनामुळे सुरक्षित मातृत्व मिळवणे शक्‍य !

डॉ. साडेकर म्हणाले, गर्भवती महिलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) कमी असते. मधुमेह (Diabetes), रक्तदाब (high blood pressure), फुप्फुसाचे आजार (lung disease) यासाठी वेगळी काळजी घेऊन उपचार सुरू असतात. गर्दीमध्ये जाऊ नका, डोळे, कान, नाक, तोंडाला हात लावू नका, आईसह होणाऱ्या बाळाची काळजी घेणे महत्त्वाचे असल्याने प्रत्येक घटना वैद्यकीय अधिकाऱ्यांना लगेच सांगा. तसेच सल्ला घ्या, असे महिलांना सांगितले होते. प्रशिक्षकांकडून योगाचे शिक्षण घ्या, व्यायाम करा, कोरोना संसर्गाची भीती बाळगू नका, स्वतःचे मनोबल चांगले ठेवा, खोकला, ताप, सर्दी, चव गेली असेल तर लगेच रुग्णालयात जा, असा प्रत्येक महिलेला सांगितले होते. आहारामध्ये रोज सकाळी, संध्याकाळी ताजे जेवण करा, पालेभाज्या, गोड - आंबट फळे खा, तळलेले, पॅकिंगचे पदार्थ खाऊ नका, कोरोना संसर्गापासून दूर राहा अन्‌ झाला तरी बरा होतोय, असा आधार महिलांना दिला होता.

हेही वाचा: हॅलो, तुमची तब्येत कशी आहे? महापालिकेतर्फे विचारपूस

ठळक बाबी...

  • गर्भवती महिलांनी आरोग्याची तपासणी नियमित करावी.

  • थोडा जरी संशय आला तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

  • मनःस्थिती चांगली ठेवणे गरजेचे.

  • कोणताही निगेटिव्ह विचार करायचा नाही, स्ट्रॉंग राहावे

  • बाळासह आईच्या जीवाची खूप काळजी घ्यावी.

  • कोरोना लसीबाबत संदिग्धता आहे; घ्यावी अथवा नको यावर संशोधन सुरू आहे.

loading image