बार्शीत साकारतेय सह्याद्री वृक्ष बँक! वृक्षसंवर्धन समिती राबवणार उपक्रम

बार्शीत साकारतेय सह्याद्री वृक्ष बँक! वृक्षसंवर्धन समिती राबवणार उपक्रम
Summary

वृक्ष लागवडीसाठी वारंवार वृक्षांची कमतरता भासू लागली अन् यावर समितीमध्ये चर्चा होऊन सहकाऱ्यांच्या मदतीने सह्याद्री वृक्ष बँक निर्माण करण्याचा निर्णय झाला.

बार्शी (सोलापूर) : दरवर्षी उन्हाळ्याचा तीव्र तडाख्याने वाढणारे तापमान, प्रचंड प्रदूषणापासून मुक्ती मिळावी. तसेच पशू-पक्ष्यांसह नागरिकांना वृक्षांचा आसरा मिळावा, या उदात्त हेतू मनामध्ये ठेवून दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या वृक्षसंवर्धन समितीने देशी वाणाची दहा हजार रोपे तयार करुन सह्याद्री वृक्ष बँक निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. अशा उपक्रमामुळे समितीचे सर्वांकडून कौतुकाची थाप मिळत आहे.(Sahyadri Tree Bank has been started by producing ten thousand saplings in Barshi)

बार्शीत साकारतेय सह्याद्री वृक्ष बँक! वृक्षसंवर्धन समिती राबवणार उपक्रम
बार्शीत नऊ तोळे सोने, रोख 35 हजार रुपये लुटले

शहरातील उपळाई रोड, कुर्डुवाडी रोड, शिवाजी कॉलेज रोड, अलिपूर रोड, परांडा रोड, वाणी प्लॉट, एकता कॉलनी, गोंधिल प्लॉट, आदर्श नगर, भवानी पेठ या ठिकाणी मागील वर्षात 2 हजाट 800 वृक्षांची लागवड केली होती. त्यापैकी 2 हजार 400 वृक्ष आज टवटवीत दिमाखात रस्त्यांच्या दुतर्फा बहरु लागली आहेत.

बार्शीत साकारतेय सह्याद्री वृक्ष बँक! वृक्षसंवर्धन समिती राबवणार उपक्रम
बार्शी शहर अन्‌ तालुका "कोरोना हॉट स्पॉट'च्या दिशेने ! 

यावर्षी समितीचा 3 हजार झाडे लावण्याचा संकल्प आहे. वृक्ष लागवडीसाठी वारंवार वृक्षांची कमतरता भासू लागली अन् यावर समितीमध्ये चर्चा होऊन सहकाऱ्यांच्या मदतीने सह्याद्री वृक्ष बँक निर्माण करण्याचा निर्णय झाला. सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून बँकेची उभारणी करीत असल्याचे समितीचे अध्यक्ष उमेश काळे यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

प्रगतशील शेतकरी माधव देशमुख यांनी समितीला वृक्ष बँक उभारणीसाठी शहरातील जागा काहीं दिवस विनामूल्य देण्याचे आश्वासन दिले असून देशी वाणाचे दहा हजार रोपे तयार करण्यात येणार आहेत. शहरवासियांना बिया अथवा रोपे देऊन सहभाग नोंदविता येईल. वृक्षसंवर्धन समितीने नुसते वृक्ष लागवडच केली असे नाही तर समितीमधील सुमारे 35 जण वृक्षांना पाणी देणे, फवारणी करणे, खत टाकणे यासाठी सतर्क असतात अन् त्यामुळे खऱ्या अर्थाने वृक्षांचे संवर्धन झाले असल्याचे नागरिकांमध्ये समाधान आहे.

बार्शीत साकारतेय सह्याद्री वृक्ष बँक! वृक्षसंवर्धन समिती राबवणार उपक्रम
गृहमंत्र्यांच्या नावाने बार्शी पोलिसांनी केली पाच लाखांची मागणी ! व्यापाऱ्याचा आरोप

दोन वर्षांपुर्वी वृक्षसंवर्धन समितीची स्थापना केली, अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले पण ध्येय सोडले नाही. दानशूर दात्यांनी समितीला फवारणी पंप, खते मोफत दिली तर इंडियन रेडक्रॉस सोसायटीने दोन वर्षे पाणी देण्यासाठी मोफत वाहन दिले होते. आज समितीने स्वतःचे वाहन घेतले आहे.

- उमेश काळे, अध्यक्ष वृक्षसंवर्धन समिती, बार्शी.

बार्शीत साकारतेय सह्याद्री वृक्ष बँक! वृक्षसंवर्धन समिती राबवणार उपक्रम
बार्शी तालुक्‍यात आंदोलन पेटणार ! सरपंच परिषद, शिवसेनेचा वीज वितरण कंपनीला इशारा

वृक्षसंवर्धन करणारी टीम

संपत देशमुख, सचिन शिंदे, बाबासाहेब बारकूल, राहूल तावरे, अक्षय घोडके, उमेश नलावडे, शशी पोतदार, सुधीर वाघमारे, अमृत खेडकर, डॉ.विजय पवार, डॉ.प्रविण मिरगणे, डॉ.विनायक हागरे, हवालदार दास मस्के, संतोष मस्के, पवन खडसरे, गणेश रावळ, संदिप ढेंगळे, राणा देशमुख यांचेसह अन्य आहेत.

(Sahyadri Tree Bank has been started by producing ten thousand saplings in Barshi)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com