पाणंद रस्त्याच्या निर्मितीसाठी 5 कोटी 76 लाख रुपये - समाधान आवताडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Samadhan Autade statement 5 Crore 76 Lakhs fund for construction of Panand Road solapur

पाणंद रस्त्याच्या निर्मितीसाठी 5 कोटी 76 लाख रुपये - समाधान आवताडे

मंगळवेढा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी शेत आणि पाणंद रस्ते योजने अंतर्गत तालुक्यातील शेत आणि पाणंद रस्ते निर्मितीसाठी 5 कोटी 76 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आ. समाधान आवताडे यांनी दिली. जिल्ह्याच्या 2022-23 या अर्थिक वर्षाच्या पुरवणी नॉनप्लॅन आराखडा अन्वये हा निधी मंजूर झाला.तालुक्याच्या ग्रामीण भागातील विविध शेत आणि पाणंद रस्ते निर्मितीसाठी हा भरीव निधी मंजूर झाल्याने अनेक पाणंद रस्ते निर्मितीस चालना मिळणार आहे. या योजनेखाली मंजूर झालेल्या प्रत्येक पाणंद रस्त्यासाठी प्रत्येकी 24 लाख रुपये निधी प्राप्त होणार आहे. दळणवळणासाठी मुख्य बाबा रस्ता आहे ही गरज लक्षात घेऊन आ. आवताडे यांनी नागरिकांना शेतीकडे जाण्यासाठी आवश्यक तो रस्ता उपलब्ध व्हावा यासाठी आ. आवताडे यांनी केलेल्या अथक प्रयत्नांना यश मिळाले.

रहाटेवाडी- कल्याण पवार वस्ती ते बळी पवार वस्ती, रहाटेवाडी तामदर्डी रस्ता ते आवताडे पवार वस्ती, सलगर खु - मासाळ- भुसनर- चौंडे वस्ती ते तेलगाव वस्ती पासून बावची जाणारा रस्ता, लक्ष्मीदेवी मंदिर ते बाळासाहेब बावचे वस्ती रस्ता ढवळस,जैन- हरिजन- होनमाने- पाटील -कोळी वस्ती रस्ता उचेठाण, बोराळे गावठाण ते भालेवाडी मधला निगप्पा लंगोटी वस्ती, अरळी ते बसनाळे वस्ती रस्ता, पोलीस स्टेशन ते मधला गणेशकर वस्ती रस्ता, येड्राव मरवडे हद्दीवरील अमोल माने वस्तीपर्यंत, कागष्ट ते डिकसळ, मरवडे येथील दिगंबर मासाळ घर ते काळा ओढा , मारापुर गावठाण ते भाटेमळा कुलकर्णी वस्ती , घरनिकी - मारापुर नवबिगा ते अकोला रस्ता विठ्ठलवाडी वस्ती ते तानगावडे वस्ती, चोखामेळानगर धनाजी खवतोडे वस्ती ते सोमनाथ गुरुजी वस्ती रस्ता,डोंगरगाव ते हाजापूर शिव रस्ता डॉ हेंबाडे यांची घरापासून ते पाटखळला जोडणारा रस्ता, डोंगरगाव ते पाटखळ शिव रस्ता खडतरे वस्ती ते हेंबाडे वस्ती रस्ता, लवटे वस्ती खुपसंगी ते जि. प.शाळा ते जगदाळे वस्ती रस्ता,वाघमोडे वस्ती लोणार ते बुरुंगले वस्ती, पोकळे वस्ती मारोळी ते करे वस्ती रस्ता, एकनाथ कोळकर वस्ती महमदाबाद ते हुन्नूर लोणार रस्ता, कांबळे वस्ती लक्ष्मी दहीवडी ते होनमाने वस्तीपासून ते रांजण स्टॉप पर्यंतचा रस्ता, भालेवाडी ते तळसंगी फाटा रस्ता, अकोला रस्ता ते सावंजी वस्ती ते आसबे वस्ती रस्ता, आसबे वस्ती चोखामेळानगर ते अकोला शिव रस्ता या रस्त्यांना निधी मंजूर झाला.

तालुक्याच्या ग्रामीण भागात शेती हे उपजीविकेचे आणि उत्त्पन्नाचे प्रमुख साधन आहे. शेती उत्त्पन्नातून तयार होणारे अर्थचक्र अनेकांच्या कौटुंबिक विकासासाठी महत्वाची बाब आहे मात्र अनेक ठिकाणी रस्त्याविना शेती नापीक ठेवण्याची वेळ येते ही बाब लक्षात घेतल्याने या निधीमधून भौतिक विकासाचे चक्र अधिकच गतिमान होणार आहे.

- आमदार समाधान आवताडे,पंढरपूर मंगळवेढा

Web Title: Samadhan Autade Statement 5 Crore 76 Lakhs Fund For Construction Of Panand Road Solapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top