
सांगोला : 40 सोसायटीच्या निवडणूका झाल्या बिनविरोध
सांगोला : सांगोला तालुक्यामध्ये एकूण 81 विविध कार्यकारी सेवा सोसायट्या आहेत. या 81 सोसायट्यांपैकी 67 सोसायट्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू असुन यातील जवळजवळ 40 विविध कार्यकारी सोसायट्या या बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे सांगोला तालुक्यात सोसायट्यांच्या बिनविरोध करण्याकडे मोठा कल असला तरी अनेक गावच्या सोसायट्या या चुरशीने निवडणूका लढविल्या जात असल्याचे चित्र तालुक्यात स शेतकरी खासगी बँकांचे कर्ज मोठ्या प्रमाणात सध्या ध्या दिसून येत आहे.
विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुका म्हटलं, की तो त्या गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा पायाच समजला जात होता. शेतकऱ्यांना आपल्या गावातच आर्थिक मदत मिळावी महान मोठ्या प्रमाणात विविध कार्यकारी सोसायट्या या निर्माण झाल्या होत्या. परंतु गेल्या अनेक वर्षापासून सोसायटींमध्ये नवीन शेतकऱ्यांना कर्ज मिळत नसल्याने अनेक संस्था या डबघाईला आलेल्या असल्याचे दिसून येते. सध्या कोरोना महामारीच्या काळानंतर तालुक्यातील 67 विकास कार्यकारी सोसायटींच्या निवडणूका लागल्या आहेत. सध्याच्या नियमाप्रमाणे सोसायटीच्या कर्जदार व बिगर कर्जदार सर्व सदस्यांना निवडणुकीतील सर्वच उमेदवारांना मतदान करण्याचा अधिकार दिला गेला असला तरी तालुक्यात आतापर्यंत जवळजवळ 40 विविध कार्यकारी सोसायटी या बिनविरोध झाल्या आहेत. परंतु ज्या गावात सोसायटीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या नाहीत अशा गावांमध्ये निवडणुका चुरशीने लढल्या गेल्या आहेत. तालुक्यात 81 विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांसह एकूण 316 संस्था आहेत.
सर्वाधिक सोसायट्या बिनविरोध झाल्याने या सोसायटीमध्ये सर्वच पक्षाचे सर्व उमेदवारांना सामावून घेऊन निवडणूक बिनविरोध करण्याकडे कल दिसून येतो. निवडणूक बिनविरोध झाल्याने पक्षापेक्षा स्थानिक आघाड्यांना प्राधान्य दिले जाते. परंतु या बिनविरोध झालेल्या सोसायट्यांमध्येही अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीच्या वेळी मात्र राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग येतो. येथेच स्थानिक राजकारणाच्या कुरघोडी सुरू होतात त्यामुळे गेल्या वेळेस बिनविरोध झालेल्या सोसायट्या या अशा कुरघोडीच्या राजकारणामुळे त्या ठिकाणी निवडणुका लागल्या जातात.
फक्त एक वेळ चेअरमन होवु द्या...!
विविध कार्यकारी सोसायटी मध्ये गेल्या काही वर्षांमध्ये ना जुन्या शेतकऱ्यांना वाढीव कर्ज मिळत आहे किंवा ना नवीन शेतकऱ्यांना हवे तसे कर्ज मिळत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी हे सोसायटी कडुन बँकांकडे कर्जासाठी गेले आहेत. त्यातील शेतकरी खाजगी बँकांचे कर्ज मोठ्या प्रमाणात घेत आहे. अशा परिस्थितीतही निवडणुकांमध्ये आपल्याच पक्षाच्या, गटाचा व स्वतःला गावातील सोसायटीमध्ये अध्यक्षपद मिळावे यासाठी अनेकांची धडपड सुरू असते. काही गावातील सोसायटीचे महिनोनमहिने बंदच असतात. परंतु गावच्या सोसायटीचे अध्यक्षपद मिळवण्यासाठी तसेच बिनविरोध निवडणुकीमध्ये हे मलाच एक वेळ चेअरमन होऊ द्या ही अट प्राथमिक स्वरूपात अनेक घालत असल्याचे दिसून येते.
कशासाठी अध्यक्षासाठी..
आगामी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षाला महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोध असो किंवा निवडणूक लागलेली असो आपल्याच गटाचा, पक्षाचा अध्यक्ष कसा होईल याकडे, गावपुढाऱ्याचे, गटनेत्याचे, पक्षनेत्यांचे लक्ष लागले आहे.