NCP Protest : जयंत पाटील यांना ईडीच्या नोटिसीबद्दल सांगोल्यातील राष्ट्रवादी काँग्रेसने केला निषेध व्यक्त sangola ncp protest for jayant patil ed notice | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NCP protest

NCP Protest : जयंत पाटील यांना ईडीच्या नोटिसीबद्दल सांगोल्यातील राष्ट्रवादी काँग्रेसने केला निषेध व्यक्त

सांगोला - भाजपाच्या विरोधात खंबीर भूमिका घेऊन सामान्य जनतेच्या हक्कासाठी आवाज उठवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर ईडी कारवाई करत असल्याचा आरोप करून सांगोल्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चांगलीच आक्रमक झाली आहे. माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यावरील ईडीची कारवाई ही निव्वळ सूडबुद्धीने असल्याचा आरोप करत भाजपा आणि ईडीचा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करीत निवेदन दिले केला.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सक्तवसुली संचालनालयाने चौकशीसाठी बोलविले होते. यानंतर राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. सांगोला येथील तहसील कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी व ईडी सूडबुद्धीने वागत असल्याचा आरोप करून त्यांच्या या कृत्याचा तहसीलदारांना लेखी निवेदन देऊन निषेध केला.

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मधुकर बनसोडे, शिवाजी कोळेकर, युवकचे तालुकाध्यक्ष अनिल नाना खटकाळे, जिल्हा उपाध्यक्ष बिरा पुकळे, चंद्रकांत शिंदे, शहराध्यक्ष तानाजी पाटील, माजी नगराध्यक्ष अनिल खडतरे, नगरसेवक सतीश सावंत, सोमनाथ लोखंडे, आलमगीर मुल्ला, कार्याध्यक्ष संभाजी हरिहर, अजित गोडसे, विद्यार्थी काँग्रेसचे अमोल सुरवसे, शोएब इनामदार, भारत साळुंखे, विजय पवार, असलम पटेल, किरण पवार, श्रीधर पवार, रामचंद्र पवार, सुनील गायकवाड, नितीन वसेकर, दिग्विजय दिघे, महेश हजारे, विनोद रणदिवे, राज मिसाळ, दीपक चव्हाण, रामचंद्र दिघे विजय बजबळे आदिसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सत्तेचा गैरवापर करून केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेले भारतीय जनता पार्टी सामान्य लोकांच्या हक्कासाठी त्यांच्याविरुद्ध आवाज उठवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत नेहमीच सूडबुद्धीने वागत असल्याचा आरोप यावेळी संभाजी हरिहर यांनी केला. तर, यापूर्वी छगन भुजबळ अनिल देशमुख नवाब मलिक यांच्यावरही ईडीने भाजपच्या इशाऱ्यानुसारच कारवाई केली होती.

ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असूनही ज्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे त्यांच्याकडे ईडी दुर्लक्ष करते आणि जे लोक भाजपा विरोधात लढतात त्यांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रकार काही वर्षांपासून सुरू आहे. मात्र महाराष्ट्रातील जनता हा अन्याय आणि त्रास आता सहन करणार नाही. भाजपला आगामी काळात आपण जशास तसे उत्तर देऊ असेही यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मधुकर बनसोडे यांनी स्पष्ट केले.