शहरातील शाळा उद्यापासून सुरू! नियमांच्या उल्लंघनास मुख्याध्यापक असणार जबाबदार | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

schools are reopen in solapur
शहरातील शाळा उद्यापासून सुरू! नियमांच्या उल्लंघनास मुख्याध्यापक असणार जबाबदार

शहरातील शाळा उद्यापासून सुरू! नियमांच्या उल्लंघनास मुख्याध्यापक असणार जबाबदार

सोलापूर : सध्या मृत्यूदर व रुग्णालयातील कोरोना रुग्णांची संख्या खूपच कमी आहे. मागील तीन दिवसांपासून राज्यातील रुग्ण निम्म्याने कमी झाले आहेत. त्यामुळे सोलापूर शहरातील पूर्व प्राथमिक व पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळा उद्यापासून (मंगळवारी) सुरू करण्यास महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी परवानगी दिली आहे. दररोज सकाळच्या सत्रात चार तासांचीच शाळा भरविली जाणार आहे. शाळेत कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्यास, त्या शाळेतील मुख्याध्यापकाला जबाबदार धरून कारवाई केली जाणार आहे.

हेही वाचा: सोलापूर विद्यापीठाला 'नॅक'चे 'बी ++' मानांकन!

सोलापूर शहर-ग्रामीणमधील कोरोनाची स्थिती पाहून 1 फेब्रुवारीपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर म्हणाले होते. रुग्ण कमी झाल्याने शहरातील शाळा सुरू करण्यासंदर्भातील मागणी जोर धरू लागली होती. मागील काही दिवसांत शहरातील रुग्ण घटले आहेत. त्यामुळे शाळा सुरू करण्यास हरकत नाही, असे प्रशासनाचे मत होते. त्यादृष्टीने शाळांची स्वच्छता, शिक्षकांची कोरोना टेस्ट, पालकांची संमती, अशा बाबींची पूर्तता केली. ग्रामीणमधील शिक्षकांच्या अद्याप कोरोना चाचण्या केल्या नसल्याने ग्रामीणमधील शाळांचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, शाळा सुरु केल्यानंतर त्याठिकाणी कोरोनासंबंधीचे नियम तंतोतंत न पाळल्यास मुख्याध्यापकाला जबाबदार धरले जाणार आहे. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी दिला आहे. मर्यादित उपस्थितीत वर्गखोल्यांची उपलब्धता पाहून मुख्याध्यापकांनी त्यांच्या सोयीने शाळेची वेळ ठरावावी, असेही प्रशासनाधिकारी कादर शेख यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा: शिवाजी विद्यापीठाला नॅकचे ‘ए प्लस प्लस’ मानांकन ; सात निकषांवर मूल्यांकन 

कोरोनाबाधितांना 15 दिवसांची सुट्टी

कोरोनाची स्थानिक परिस्थिती, शाळेतील विद्यार्थी, उपलब्ध वर्गखोल्या, उपस्थित विद्यार्थ्यांवर आधारित मुख्याध्यापकांनी शाळेची वेळ निश्‍चित करावी. विद्यार्थ्यांची उपस्थिती अधिक आणि वर्गखोल्यांची उपलब्धता अपुरी असल्यास दोन शिफ्टमध्ये शाळा भरवावी, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मात्र, शाळेची वेळ चार तासांपर्यंतच असावी, असेही मुख्याध्यापकांना बजावण्यात आले आहे. दरम्यान, शाळा सुरू होण्यापूर्वीच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणीचे बंधन घातले आहे. लक्षणे नसल्याने घरी राहून उपचार घेणाऱ्या शिक्षकांना 15 दिवसांची (दोन आठवडे होम क्‍वारंटाईन) सुट्टी दिली जाणार आहे.

हेही वाचा: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांच्या सर्वाधिक मृत्यूची नोंद; वाचा सविस्तर

शहरातील 241 प्राथमिक व 157 माध्यमिक शाळांमध्ये एक लाख 61 हजार 226 विद्यार्थी आहेत. 1 फेब्रुवारीनंतर शहरातील शाळा सुरू होणार असून दररोज चार तास शाळा भरेल. विद्यार्थ्यांची सुरक्षितता व गुणवत्ता याबाबींना प्राधान्य द्यावे, अशा सूचना मुख्याध्यापकांना दिल्या आहेत.

- कादर शेख, प्रशासन अधिकारी, प्राथमिक शिक्षण मंडळ, सोलापूर महापालिका

Web Title: Schools In The City Start Tomorrow The Principal Will Be Responsible For The Violation Of The Rules And Covid Rules In Solapur P Shivshankar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SolapurCoronavirusschool
go to top