
Solapur: महाविकासच्या वज्रमूठ सभेमुळे भाजप भयभीत, एक तास राष्ट्रवादीसाठी उपक्रम
सोलापूर: राज्यामध्ये विविध ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र सभा होत आहेत. या सभांना मिळणारा जनतेचा प्रतिसाद पाहून भारतीय जनता पार्टी भयभीत झाली आहे. तपास यंत्रणेच्या माध्यमातून विरोधकांना त्रास देण्याचे काम भारतीय जनता पार्टी कडून सुरू आहे.
वाढती महागाई बेरोजगारी यांच्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी राज्यांमध्ये व देशांमध्ये जातीय तणाव वाढवण्याचे काम भाजप करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे पक्ष निरीक्षक शेखर माने यांनी केला.
सोलापूर शहरामध्ये सत्यनाम चौकातील क्रीडांगणात व नई जिंदगी येथील सिद्धेश्वर नगर भाग तीनमध्ये एक तास राष्ट्रवादीसाठी, आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी हा उपक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते.
संगीता जोगदनकर व कविता पाटील यांनी हा उपक्रम घेतला. या वेळी पाश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा कविता म्हेत्रे, शहराध्यक्ष भारत जाधव, संतोष पवार, महेश कोठे, महेश गादेकर, सुधीर खरटमल, शंकर पाटील, ॲड. यु. एन. बेरिया, नलिनी चंदेले, सुनीता रोटे, संगीता जोगधनकर, प्रमोद भोसले, चंद्रकांत पवार, बिस्मिल्ला शिकलगार, सनी म्हेत्रे, लता ढेरे गफूर शेख, फारुख मटके, शशिकला कस्पटे,
हर्षल प्रधाने, बसवराज बगले, डॉ. दादाराव रोटे, संजय कुऱ्हाडे, प्रवीण वाडे, अभिजित भंडारे, सुरेखा घाडगे, प्रिया पवार, मोनिका सरकार आदी उपस्थित होते. यावेळी राहुल बाळकोटे, सूर्यकांत शिवशरण, विठ्ठल गायकवाड, बळिराम एडके, दुर्योधन मस्के, सविता मनसावाले, प्रतिभा चौगुले यांच्यासह इतर कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश घेण्यात आला.