
Corona Update : शहरात कोरोनाचे नवे रुग्ण; महापालिकेची यंत्रणा सज्ज
सोलापूर : शहरात काही दिवसांपासून कोरोनाचे नवे रुग्ण आढळून येत आहेत. यासंदर्भात महापालिकेच्या आरोग्य विभागाला आवश्यक त्या उपाययोजना व दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत. तशी परिस्थिती उद्भवल्यास आरोग्य विभागाची यंत्रणा सज्ज आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली - उगले यांनी दिले.
शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. शहरात सध्या १७ रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णांची वाढती संख्या पाहता भविष्यात कोणतीही परिस्थिती उद्भविल्यास आरोग्य विभागाची यंत्रणा सज्ज आहे.
रुग्णांसाठी ऑक्सिजन, बेड यांची मुबलक उपलब्धता आहे. कोरोनाच्या नवीन रुग्णांबाबत आवश्यक ते वैद्यकीय काळजी घेत आहे. नागरिकांनीही कोरोनाचे नियम पाळावेत. शेजारी परिसरात रुग्ण आढळल्यास तत्काळ चाचणी करण्याच्या सूचना कराव्यात. औषधोपचार करण्यास सांगावे असे आवाहन महापालिका आयुक्त तेली - उगले यांनी केले आहे.
नागरिकांच्या मागणीप्रमाणे कोरोना लसी उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. लसीकरणात कोणतीही अडचण येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. कोरोना रुग्ण वाढीच्या संदर्भात ‘सकाळ’ने सोमवारच्या (ता. १३) अंकात वृत्त प्रकाशित केले होते.यात शहर-जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण व लसीकरणावर प्रकाश टाकला होता. तद्नंतर आयुक्त तेली-उगले यांनी प्रशासनाला सुचना दिल्या आहेत.