सोलापूर : पत्नीच्या आजारपणामुळे ‘तो’ बनला दुचाकी चोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

solapur city crime police officers

सोलापूर : पत्नीच्या आजारपणामुळे ‘तो’ बनला दुचाकी चोर

सोलापूर : पेंटर म्हणून मिळेल तेथे काम करणारा शफी मौला शेख (वय ५२, रा. नई जिंदगी) याला दोन मुले आहेत. त्यांचा सांभाळ करताना पत्नीला पॅरेलेसीस झाल्याने ती बेडवरच पडून आहे. शफीच्या कमाईतून पत्नीच्या उपचाराचा खर्चही भागत नव्हता. त्यामुळे तो हँडल लॉक नसलेल्या दुचाकी चोरून दुसऱ्याकडे गहाण ठेवून पैसे मिळवायचा. त्याला पोलिसांनी ८ जुलैला अटक केली असून, त्याच्याकडून शहर गुन्हे शाखेच्या पथकाने दहा दुचाकी जप्त केल्या आहेत.

दुचाकी चोरणारा शफी शेख हा चोरीची दुचाकी घेऊन कुमठा नाका परिसरातील पारशी विहिरीजवळील महापालिकेच्या बस थांब्याजवळ उभा असल्याची माहिती खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली. गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील व त्यांच्या पथकाने ८ जुलैला त्या ठिकाणी सापळा रचला. त्याला पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले आणि दुचाकी चोरीबद्दल चौकशी केली. त्यावेळी होम मैदान, गणपती घाट, रूपाभवानी मंदिर अशा वेगवेगळ्या ठिकाणांहून दहा दुचाकी चोरल्याची कबुली त्याने दिली.

पत्नीच्या आजारपणामुळे दुचाकी चोरल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले. त्याच्याकडील संपूर्ण मुद्देमाल पोलिसांना मिळाल्याने शफी शेख याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी ठोठावली. ही कामगिरी पोलिस आयुक्त राजेंद्र माने, पोलिस उपायुक्त बापू बांगर, सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. प्रीती टिपरे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिस अंमलदार अमित रावडे, श्रीकांत पवार, राहुल तोगे, विजयकुमार वाळके, गणेश शिंदे, नवनीत नडगेरी, सचिन होटकर यांच्या पथकाने केली.

Web Title: Solapur Crime Branch Two Wheeler Thief

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..