
Solapur Crime : पत्नीच्या अनैतिक संबंधाला वैतागून पतीची आत्महत्या; चौघांविरोधात गुन्हा दाखल
मोहोळ : पत्नीचे चुलत भावाशी अनैतिक असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पत्नीला वारंवार समजावून सांगूनही ती ऐकत नसल्याने वैतागलेल्या पतीने खिशात चिठ्ठी ठेवुन विषारी औषध प्राशन करून ता 23 मे रोजी औंढी ता मोहोळ येथे आत्महत्या केली होती.
मृताची पत्नी, तिचा प्रियकर व अन्य एक महिला व पुरुष अशा चौघां विरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या बाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार,औढीं येथील नेताजी हिंदुराव भुसे वय 37 याचा विवाह 14 वर्षापुर्वी सोलापूर येथील शुभांगी डुकरे. हिच्या बरोबर झाला होता.
त्यांना दोन मुले आहेत.दरम्यान मयत नेताजी भुसे याने डिसेंबर 2022 मध्ये आई व वडिल शेतात काम करत असताना त्यांना येवुन म्हणला की, मी जे काही तुम्हाला सांगणार आहे, ते तुम्ही कोणालाही सांगु नका, मला वचन द्या, त्यावेळी त्याच्या आई वडिलांनी त्याला धिर देवुन काय झाले आहे? असे विचारले.
नेताजीने रडत सांगितले की माझी पत्नी शुभांगी हिचे पांडुरंग द्रोनाचार्य भुसे याचे सोबत अनैतिक संबंध आहेत . त्यावरून मी शुभांगीला तु पांडु सोबत का जाते, मला गावातील लोक नावे ठेवायला लागले आहेत. तुमच्या अशा वागण्यामुळे माझी बदनामी होत आहे. तु असे करू नको आपल्याला दोन मुले आहेत, आपला संसार सुखात आहे, त्याचा विचार कर. पांडुच्या
नादाला लागू नको असे शुभांगीला सांगितले.परंतु ती मला म्हणाली, मी त्याच्या सोबत बोलणार, तुला जे करायचे ते कर, तु मला त्रास देवु नको असे उलट बोलली असे नेताजीने आई-वडिलांना सांगितले. त्यानंतर नेताजीच्या आई-वडिलांनी सून शुभांगी हिला समजावून सांगितले त्यावेळी शुभांगी हिने मला माफ करा चूक झाली यापुढे असे करणार नाही असे सांगितले होते.
नंतर एक ते दिड महिन्याने पुन्हा शुभांगी चुकीचे वागु लागल्याने गावातील प्रतिष्ठित लोकांनी पांडु भुसे याला समजावून सांगत तुझे आणि शुभांगी चे असलेले अनैतिक संबंध बंद कर त्यांचा संसार संपेल. तु यापुढे नेताजीच्या घरी यायचे नाही. शुभांगीला फोन करायचा नाही.
तुमचे दिर भावजयचे नाते आहे. झाले गेले सगळे सोडुन दे, यापुढे असे वागु नको, असे त्याला शुभांगी समोर सांगितले होते. तेव्हा पांडुरंग भुसे याने पुन्हा असे वागणार नाही असे सर्वांसमोर कबुल केले होते.
वारंवार समजावून सांगूनही पांडुरंग भुसे व शुभांगी या दोघांचे अनैतिक संबंध सुरूच होते. शुभांगी पुन्हा वाईट मार्गाने वागत असल्याने पत्नीच्या वागण्याला वैतागलेल्या नेताजीने ता 23 रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास बालाजी भुसे याच्या शेतात विषारी औषध प्राशन केलेल्या अवस्थेत आढळून आला.
त्याला तात्काळ उपचारा करिता सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी नेताजी भुसे हा उपचारापुर्वीच विषारी औषध प्राशन करून मयत झाला असल्याचे सांगितले.ता 25 रोजी तिसऱ्या दिवसाचा कार्यक्रम झाल्या नंतर नेताजीचा मुलगा श्रेयस याला वडिलाच्या खिशात एक चिठ्ठी आढळुन आली.
चिठ्ठीत नेताजी याने "मी पत्नी शुभांगी सह ,पांडुरंग द्रोणाचार्य भुसे,आप्पा रामहरी भुसे रा.औढी व राधाअक्का जिवनाथ डुकरे रा. सोलापूर यांनी प्रवृत्त केल्यामुळेच आत्महत्या करित आसल्याचे उल्लेख केला होता. त्यानुसार मृत नेताजी चे वडील हिंदुराव भुसे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार वरील चौघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी मोहोळ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे करीत आहेत.