सोलापूर : घर किंवा दुकान घेण्यासाठी थेट कर्ज

‘ऑफॉर्डेबल हाउसिंग लोन’च्या माध्यमातून अल्प उत्पन्न गटाला मदत
Home Loan
Home LoanSakal

सोलापूर : अल्प उत्पन्न गटातील व्यक्तींना घर, दुकान खरेदीसाठी कर्जासाठी टाटा कॅपिटलचा फ्लेक्झी प्लस प्लान उपयुक्त ठरला आहे. टाटा कॅपिटल्स उद्योग समुहाने हा प्लान आणलेला आहे. या प्लानमध्ये अनेक प्रकारच्या सुविधा ग्राहकांना मिळवून दिल्या आहेत. समाजातील अनेक व्यक्ती या दुकानात कामे करणे, रोख पगारदार, छोटा व्यापार, हातगाडा, हॉकर्स, कारागिरी व्यवसाय या सारखे हातावरची कामे करून उत्पन्न मिळवतात. त्यांची कमाई कागदोपत्री नसते तर ती रोख स्वरुपात असते. त्यांना बॅंकांचे व्यवहार अल्प उत्पन्नामुळे करता येत नाहीत. त्यामुळे बॅंकाकडून कोणतीही कर्जाची मदत मिळणे अशक्य होते.

या अल्प उत्पन्न गटातील लाभार्थींना फ्लेक्झी प्लानचा उपयोग होऊ लागला आहे. त्यांच्या कमाईनुसार घरखर्च वेगळा करून या लाभार्थ्याला उर्वरीत रकमेचा कर्ज हफ्ता निश्चित करून कर्ज दिले जाते. त्याद्वारे लाभार्थी नवीन वा जुने दुकान खरेदी, नवीन वा जुने घर खरेदी, प्लॉट व बांधकाम, बिल्डर डेव्हलप फ्लॅट/रो हाऊस/ बंगला प्रॉपर्टी, यासाठी कर्ज घेऊ शकतो. या पध्दतीने या प्लानमध्ये अधिकाधिक लाभ कर्जासोबत जोडून दिले जातात. तसेच कर्ज फेडीची मुदत देखील इतर बॅंकाच्या तुलनेत अधिक मिळत असल्याने कर्जदारास कमी रकमेचा हफ्ता पडतो. तसेच व्याजदर देखील अत्यंत कमी असतात.

प्लानची वैशिष्ट्ये सुलभ कर्ज प्रक्रिया

कमी व्याजदर

वेगवान प्रोसेसिंग

सोपे रक्कम हस्तांतरण

टॉप अप लोनची सुविधा

कमीत कमी कागदपत्रे

फ्लेक्झी प्लस प्लानच्या माध्यमातून या आर्थिक वर्षात सोलापूर शहरातील शेकडो लोकांना गृह कर्ज वाटप पूर्ण झालेले आहे. या योजनेला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे.

- युवराज शिंदे,ब्रांच इन्चार्ज, टाटा कॅपिटल, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com