Solapur : दिव्यांगाच्या प्रश्नासाठी कायम त्यांच्या सोबत राहील ; आ अवताडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur

Solapur : दिव्यांगाच्या प्रश्नासाठी कायम त्यांच्या सोबत राहील ; आ. अवताडे

मंगळवेढा : उपोषणातून न्याय मिळवण्यामध्ये प्रहार संघटना आघाडीवर राहिली. परंतु आता राज्यात व केंद्रातील सत्तेबरोबर तुमच्याच घरातला आमदार असल्यामुळे आता प्रश्नासाठी उपोषण करावे लागणार नाही मी तुमच्या प्रश्नासाठी तुमच्या सोबत कायम राहील अशी ग्वाही आ.समाधान आवताडे यांनी दिली.

प्रहार संघटनेच्या प्रयत्नातून दिव्यांगांना शिधापत्रिका वाटपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी नायब तहसीलदार सुधाकर धाईजे,मा. नगराध्यक्षा अरुणा माळी,जिल्हा उपाध्यक्ष सिदराया माळी ,तालुका उपाध्यक्ष रोहिदास कांबळे ,राकेश पाटील युवराज शिंदे,बापू पांढरे माजी सभापती प्रदीप खांडेकर, पुरवठा निरीक्षक हनुमंत पाटील ,शिवाजी भोसले,आदर्श शिक्षक अर्जुन आवताडे ,दत्तात्रय जाधव, आनंद गुंगे,युवराज टेकाळे, नवनाथ मासाळ ,अनिल दोडमिसे, सतीश जावळे, सुधीर हजारे ओंकार नागणे, प्रसाद सलगर ,निलेश इंगळे ,शकील खाटीक ,राम मेटकरी, संभाजी मस्के, पिंटू कोळेकर, सर्जेराव पारध्ये, संजय वाघमोडे ,संतोष यादव ,सविता सुरवसे ,वंदना माने, माधुरी टकले, रुक्मिणी कोकरे, शबाना मकानदार, किरण शेवडे, शिवानंद नराळे,अतुल जाधव , विवेक कुंभारे सह प्रहार चे कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी आ.आवताडे यांच्या उपस्थितीत 100 दिव्यांगांना शिधापत्रिकाचे वाटप व पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी दावल इनामदार व विजय भगरे यांच्या निवडीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना आ. अवताडे म्हणाले की तुम्ही आणि मी एकच असल्याने मी आमदार नसून तुम्हीच आमदार असल्यासारखे आहे.म्हणून आपण सगळे मिळून तुमच्या प्रश्नासाठी प्रयत्न करूया.

नगरोत्थान मधून दिव्यांग भवन शिफारस करून दिव्यांगासाठी आमदार निधीतून 10 लाखाचा निधी देणार असल्याचे सांगितले.प्रहारचे तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे म्हणाले की दिव्यांगांना शिधा पत्रिका मिळवण्यासाठी अनेक वर्षापासून लढत होतो त्यासाठी नगराध्यक्षा अरुणा माळी,पुरवठा विभाग, आ. समाधान आवताडे यांनी केलेल्या मदतीमुळे दिव्यांगांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ मिळाला. आ.आवताडेनी पोटनिवडणुकीत दिलेला शब्द पुर्ण करुन दिला.तालुका उपाध्यक्ष राकेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन दत्तात्रय जाधव यांनी तर आभार रोहिदास कांबळे यांनी मानले