सोलापूर जिल्ह्यात 2199 ऍक्‍टिव्ह कोरोनाबाधित, नवे बाधित 185, कोरोना मुक्त 126  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

logo

जिल्ह्यातील एकूण 42 हजार 560 बाधितांपैकी 38 हजार 837 जण कोरोना मुक्त झाले आहेत. कोरोना मुक्त झालेल्यांमध्ये ग्रामीण भागातील 29 हजार 955 तर महापालिका हद्दीतील 8 हजार 882 जणांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील कोरोना मुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या आता 30 हजारांच्या घरात आली आहे. 

सोलापूर जिल्ह्यात 2199 ऍक्‍टिव्ह कोरोनाबाधित, नवे बाधित 185, कोरोना मुक्त 126 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर महापालिका हद्दीत सध्या 442 तर ग्रामीण भागात 1 हजार 757 असे एकूण 2 हजार 199 एवढेच ऍक्‍टिव्ह कोरोना बाधित रुग्ण शिल्लक राहिले आहेत. या रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आजच्या अहवालानुसार ग्रामीण भागात 158 महापालिका हद्दीत 27 अशा एकूण 185 कोरोना बाधितांची भर आज जिल्ह्याच्या आकडेवारीत पडली आहे. 

सोलापूर शहरात आतापर्यंत 9 हजार 874 जणांना तर ग्रामीण भागात 32 हजार 686 जणांना कोरोनाची बाधा झाली. आजच्या अहवालामध्ये चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातील दोन व महापालिका हद्दीतील दोन व्यक्तींचा समावेश आहे. कोरोना चाचणीचे अद्यापही 55 अहवाल शिल्लक असून हे सर्व आव्हाल ग्रामीण भागातील आहेत. सोलापूर जिल्ह्यातील 3 लाख 42 हजार 315 कोरोना चाचणी निगेटीव्ह आल्या आहेत. 

loading image
go to top