esakal | संचारबंदीत आता गाव पातळीवर समित्या 
sakal

बोलून बातमी शोधा

corona

शहरातील गर्दी व जीवनावश्‍यक वस्तूंच्या साठेबाजीवर नियंत्रण ठेवून लोकांपर्यंत अन्नधान्याचा पुरवठा सुरळीत होतो की नाही, याची खातरजमा या समित्यांनी करायची आहे. तसेच अन्न धान्य वितरण अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून योग्य कार्यवाही करावी, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर म्हणाले.

संचारबंदीत आता गाव पातळीवर समित्या 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : संचारबंदीच्या कालावधीत जिवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहावा आणि त्यात साठेबाजी होऊ नये तसेच परजिल्ह्यातून अथवा परराज्यातून येणाऱ्यांची तपासणी व्हावी, यासाठी शासनाच्या आदेशानुसार गाव पातळीवर आता ग्राम समित्या स्थापन करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मंगळवारी (ता. 24) घेतला. 
शहरातील गर्दी व जीवनावश्‍यक वस्तूंच्या साठेबाजीवर नियंत्रण ठेवून लोकांपर्यंत अन्नधान्याचा पुरवठा सुरळीत होतो की नाही, याची खातरजमा या समित्यांनी करायची आहे. तसेच अन्न धान्य वितरण अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून योग्य कार्यवाही करावी, असे जिल्हाधिकारी म्हणाले. जिल्हास्तरीय समितीत अन्नधान्य वितरण अधिकारी, अध्यक्ष, उपविभागीय कृषी अधिकारी, विभागीय अधिकारी, सोलापूर महानगरपालिका, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव, पेट्रोल कंपनी, गॅस वितरक संघाचे अध्यक्ष, पेट्रोल-डिझेल संघाचे अध्यक्ष, भुसारी व्यापारी संघाचे प्रतिनिधी, उपनिबंधक यांचा समावेश आहे. तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय अन्नधान्य वितरण नियंत्रण समिती नियुक्ती केली आहे. या समितीत गटविकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, अध्यक्ष, गॅस वितरण संघटना, कृषि उत्पन्न बाजार समितीचे समितीचे सदस्य, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी असणार आहेत. तर गावपातळीवर तलाठ्यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यकारी संस्थांचे सचिव, कृषि सहाय्यक, आरोग्य सेवक, महिला बचत गटाच्या सचिव, महिला बचत गट ग्रामसंघाचे अध्यक्ष, पोलिस पाटील, ग्रामसेवक या समितीचे सदस्य असणार आहेत. 

अत्यावश्‍यक सेवा देणाऱ्यांसाठी विशेष ओळखपत्र 
कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू झाली असून या काळात शासकीय अधिकारी कर्मचारी व अत्यावश्‍यक सेवा पुरविणाऱ्यांना विशेष ओळखपत्र दिले जाणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली असून या समितीत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्‍वर राऊत, चंचल पाटील यांचा समावेश आहे. राऊत यांच्याकडे सोलापूर शहराचा तर पाटील यांच्याकडे ग्रामिण भागाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. दोघांनी संबंधितांची यादी प्राप्त करुन त्यांना ओळखपत्र देण्याची व्यवस्था करावी. ओळखपत्र देण्यासाठी पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षकांची मान्यता घेणे आवश्‍यक असल्याचेही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी स्पष्ट केले. 

जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले... 
- आंतरराज्य व आंतरजिल्ह्याच्या सिमेवरील चेक पोस्टद्वारे नऊ हजार 889 जणांची तपासणी 
- जिल्ह्यातील 119 जणांना ठेवले त्यांच्या घरीच निगराणीखाली : 23 जण आयसोलेशन केंद्रांवर 
- संचारबंदीच्या कलमाचे उल्लंघन करणाऱ्या सुमारे 400 हून अधिक जणांविरुध्द पोलिसांची कारवाई 
- जिवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा या हेतूने ग्राम, तालुका व जिल्हास्तरावर स्वतंत्र समित्या 

loading image