सोलापूर : स्टार्टअप करीत असताना कोणती मदत लागू शकते ?

अनेकदा हा विषय स्टार्टअपच्या लाइफवर अवलंबून असतो
Startup-Policy News
Startup-Policy Newssakal

मार्गदर्शन मालिकेत आपण स्टार्टअप करीत असताना कोणते टप्पे येतात, त्यावर कसे काम करावे, याविषयी माहिती घेतलेली आहे. आजचा विषय त्यासंबंधीच आहे, ज्यामध्ये संस्थापकाने कधी कोणास मदतीसाठी संपर्क करावा, याविषयी माहिती देणार आहे. कंपनीचा संस्थापक हा उत्साही असणे क्रमप्राप्त आहे, त्यात कोणताही पर्याय देता येत नाही. स्वत: उत्साही राहणे आणि टीमला उत्साही ठेवणे त्याचेच काम आहे. (Startup-Policy News)

कोणत्या मदतीची गरज भासू शकते?

अनेकदा हा विषय स्टार्टअपच्या लाइफवर अवलंबून असतो. उदाहरणार्थ, एखादा सक्षम स्टार्टअप सुरवातीच्या काळात कायदेशीर रचना कशी असावी? शेअर होल्डिंग, हक्क करार आणि इतर प्रमुख कायदेशीर रचना यामध्ये कायदेशीर सल्लागार मंडळी मदत करू शकतात. फंडिंग करणाऱ्या मंडळींचा आणि बोर्ड संचालकांचा परिचय असणे गरजेचे आहे, तो करून द्या. नंतरच्या काळात ग्राहक संदर्भ, कर्मचारी भरती, वाढीव भांडवल वाढविणे, भौगोलिक विस्तार आदी बाबींमध्ये मदत लागू शकते. यामध्ये अनुभवी आणि ज्ञानी मंडळी मदत करू शकतात. अर्थात पहिल्या वाढीच्या टप्प्याचा नकाशा तयार करण्यास संस्थापकास याची मदतच होते.

कोणाची मदत हवी आहे, या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी अथवा कोण देऊ शकतं, हे समजून घेण्यासाठी तीन प्रकारची मंडळी यात तुम्हास मदत करू शकतात. एक विषयातील तज्ज्ञ, दोन ज्याने स्टार्टअप चालविलेले आहे असा हॅंड्स ऑन एक्स्पिरियन्स असणारा, तीन स्टार्टअपमधील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व ही सारी मंडळी जशी आणि जेव्हा गरजेची आहेत तेव्हा ती उपलब्ध होऊ शकतात. यामध्ये इन्क्युबेशन सपोर्ट देणाऱ्या कंपनी खूप मोलाची मदत देऊ करतात.

सल्लागारांच्या योग्यतेचे मूल्यांकन कसे करावे?

सत्यापित करण्यायोग्य क्रेडेन्शियल आणि प्रशंसापत्र यांचे संयोजन वापरणे हा सर्वोत्तम मार्ग मला वाटतो. बऱ्याच वेळा जेव्हा मला कुणाचा संदर्भ विचारला जातो, त्यावेळी मी अशा सल्लागार मंडळींचा परिचय संस्थापकास करून देतो आणि त्यांना मनमोकळा संवाद साधण्याचा सल्ला देतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com